नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी जसे प्रसिद्ध आहेत, तसेच ते आपल्या कामांच्या धडाक्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत, गडकरी यांच्या काळात जसे राज्यात मोठ-मोठे प्रकल्प पार पडले. तसे आता देशात सुद्धा मोठे प्रकल्प सुरु आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातील (Central cabinet ministers) मंत्र्यांच्या कामाचा आढावा व त्यांची कामगिरी कशी आहे याबद्दल जनतेची मतं जाणून घेण्यासाठी इंडिया टूडे सी व्होटरने (India Today C Voter Survey) नुकताच एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये देशातील ऑलटाईम पाच मंत्र्यासह पंतप्रधानांबाबतही (prime minister narendra modi) जनतेचे मत जाणून घेण्यात आली. दरम्यान, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ४४.५ टक्के मतांसह सर्वोच्च स्थानी आहेत. तर टॉप पाच मंत्र्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सर्वोत्तम ठरले आहेत.
[read_also content=”अमृता फडणवीसांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट, पुणे पोलिसांनी तरुणाला केलं अटक https://www.navarashtra.com/maharashtra/about-amrita-fadnavis-offensive-comments-on-social-media-boy-arrest-by-pune-police-315284.html”]
दरम्यान, तर राजनाथ सिंग, अमित शहा (Rannath singh and amit shah) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी, एस जयशंकर (S jayshankar) चौथ्या तर स्मृती इराणी (smruti irani) पाचव्या स्थानी राहिले आहेत. २० टक्के मतांसह राजनाथ सिंग दुसऱ्या स्थानी राहिले आहेत, तर १७ टक्के जनतेनी अमित शहांना पसंती दिली आहे, त्यामुळं शहा हे तिसऱ्या स्थानी आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाच टक्के मत मिळाली आहेत, तर स्मृती इराणींना सुद्धा यांनी पाच टक्के मत मिळाली असल्यामुळं त्यांची पाचव्या नंबरवर स्थान मिळाले आहे.