दिल्लीच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
दिल्ली विधानसभेत 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप नेतृत्वाने पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवली आहे. काल दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर लगेचच दिल्ली सरकारने कामास सुरुवात केली आहे. मात्र सरकार स्थापन होऊन एकही दिवस होत नाही. तोवर आजी आणि माजी मुख्यमंत्री यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी नवीन सरकारला त्यांनी महिलांना 2500 रुपये देण्याचे दिलेले वचन याबद्दल आठवण करून दिली आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर न झाल्याने आतिशी यांनी नवीन सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र रेखा गुप्ता यांनी यावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपा की दिल्ली सरकार ने महिलाओं को दिया धोखा, पहली कैबिनेट में ही ₹2500/महीने की स्कीम पास करने के वादे को तोड़ा। महत्वपूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस। LIVE https://t.co/ktwdexwtfQ
— Atishi (@AtishiAAP) February 21, 2025
माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी महिलाना दरमहा 2500 रुपये देण्याबाबत जनतेला दिलेल्या वचनाबाबत आठवण करून दिली. यावर रेखा गुप्ता यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रेखा गुप्ता महल्या, ‘सरकार यांचे आहे . अजेंडा आमचा आहे. मग काम सुद्धा आम्हाला करू द्या. जनतेला दिलेली सर्व वचने पूर्ण होतील. आम्ही यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुषमान योजनेला मंजूरी दिली आहे. तमचे सरकार असताना तुम्ही नाकी काय केले?’
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना किती पगार?
2023 पासून दिल्लीतील आमदार आणि मुख्यमंत्री यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना बेसिक वेतन हे 60 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. दरमहा बेसिक पगार आणि अन्य सुविधा मिळून 1. 70 लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय डेली अलाऊन्स देखील मिळणार आहे. सरकारी वाहन आणि हेलिकॉप्टर अशा सुविधा देखील मिळणार आहेत.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना कोणत्या सुविधा मिळणार?
रेखा गुप्ता यांना राहण्यासाठी सरकारी निवासस्थान दिले जाईल. मात्र त्या अरविंद केजरीवाल रात असलेल्या निवासस्थानामध्ये राहणार नाहीत असे म्हटले जात आहे. सरकारी वाहनात दरमहिन्यास 700 लीटर पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. रेखा गुप्ता यांनी स्वतःचे वाहन वापरल्यास त्यासाठी त्यांना 10 हजार रुपये दिले जातील. तसेच अन्य सुविधा देखील मिळणार आहेत.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना कशी असणार सुरक्षा व्यवस्था?
रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यांना झेड सुरक्षा पुरवली आहे. दिल्ली पोलिसांचे कडे त्यांच्याभोवती असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत यलो बुक नुसार त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत त्यांच्या सुरक्षेसाठी 22 जवान तैनात असणार आहेत.