कोची : भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका विक्रांत (Aircraft carrier Vikrant) कार्यान्वित होण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या चाचण्यांदरम्यान विमानवाहू वाहकातील बहुतांश उपकरणे आणि प्रणालींव्यतिरिक्त विमान वाहतूक सुविधांच्या ((Aircraft carrier facalities) चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. देशाचा पहिला IAC विक्रांत स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत नौदलात (Navy) भरतीसाठी सज्ज झाला आहे.
दरम्यान, नौदलाने विक्रांतला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही याची खात्री केली आहे. सेवेत नियोजित कार्यान्वित होण्याच्या सुमारे एक वर्ष आधी कठोर समुद्री चाचण्यांमध्ये त्याची कसून चाचणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) 1 सप्टेंबर रोजी कोची येथे देशातील पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे लोकार्पण होणार आहे.
[read_also content=”अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाचे आणि आर्थिक शिस्तीचे ‘कॅग’ अहवालामध्ये कौतुक https://www.navarashtra.com/maharashtra/as-per-cag-report-ajit-pawar-was-best-economic-minister-in-covid-time-319391.html”]
काय आहेत विमानवाहू जहाजाची वैशिष्टे?
INS विक्रांत हे एक महाकाय जहाज आहे, जे पूर्णपणे स्वदेशी युद्धनौका आहे. त्याची लांबी 262 मीटर आणि रुंदी 60 मीटर आहे. त्याच्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर ते ४५ हजार टन वजनाचे जहाज आहे. त्याच्या निर्मितीच्या सुमारे साडेचार वर्षानंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात त्याचा समावेश करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत एकाच वेळी ३० लढाऊ विमाने वाहून नेण्यास सक्षम आहे.