सरकार इंडिगोवर कारवाई करण्याची शक्यता (फोटो- सोशल मीडिया)
इंडिगोला एअरलाईन्सला केंद्र सरकारची नोटीस
केंद्र सरकार इंडिगोवर मोठी कारवाई करण्याची शक्यता
आज देखील इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स रद्द
नवी दिल्ली: गेल्या चार ते पाच दिवसांपासून इंडिगोचा सावळा गोंधळ सुरू आहे. याचा फटका अनेक प्रवाशांना बसला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात देखील पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान आता केंद्र सरकार इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये इंडिगोची उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. केंद्र सरकार इंडिगोविरुद्ध मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. कोणतीही मोठी कंपनी असो अशा प्रकारे प्रवाशांना त्रास दिला जाऊ देणार नाही, असे केंद्र सरकारने कोर्टात सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री नायडू काय म्हणाले?
विमानांचे कामकाज स्थिर होत आहे. तसेच सुरक्षा उत्तम आहे, प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
नागर विमानन मंत्री के. राममोहन नायडू ने उड़ान ड्यूटी समय सीमा संबंधित दिशानिर्देशों से संबंधित प्रश्नों के जवाब में कहा कि विमानन सुरक्षा से कोई समझौता नहीं किया जा सकता है। उन्होंने कहा कि यह सरकार की सर्वोच्च प्राथमिकता है।#ParliamentWinterSession | @RamMNK | @MoCA_GoI pic.twitter.com/T7RoSqxdgw — आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) December 8, 2025
गेल्या काही दिवसांमध्ये विमानांची उड्डाणे रद्द झाल्यावर डिजीसीएने इंडिगोच्या विमानसेवांमध्ये 5 टक्के कपात केली आहे. ही कपात 1 डिसेंबर 2025 पासून लागू झाली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश डिजीसीएने इंडिगोला दिले आहेत.
Indigo Crisis वर सुप्रीम कोर्टाचे मोठे भाष्य
गेल्या आठवड्यापासून देशभरातील विमानतळांवर मोठा गोंधळ उडाला आहे. इंडिगोला नवीन डीजीसीए नियमांनुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक तयार करता आले नाही, ज्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे विमानतळांवर लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना तासनतास गैरसोय सहन करावी लागली. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
Indigo Crisis वर सुप्रीम कोर्टाचे मोठे भाष्य; CJI म्हणाले, ‘भारत सरकारने गंभीर…’
इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. 10 डिसेंबरपर्यंत ही अडचण दूर होण्याचा अंदाज आहे. याबाबत तातडीने सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगून सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे. वेळेवर कारवाई करण्यात आली आहे. योग्य वेळेस पाहूया. सध्या कोणतीही निकड नाही.’ सुप्रीम कोर्टाने या तातडीने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.






