नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फोन टॅपिंग (phone tapping) तसेच हेरगिरी व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (money laundering case) संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Judicial custody till August 16) दरम्यान, आज दिल्ली विशेष न्यायालयाने (Delhi special court) निर्णय देत संजय पांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
[read_also content=”धक्कादायक! नवी मुंबईत शाळकरी मुलीने केली आत्महत्या, कारण ऐकाल तर व्हाल थक्क https://www.navarashtra.com/crime/school-girl-sucide-at-navi-mumbai-nest-investigation-rable-police-312034.html”]
दरम्यान, ईडीने मंगळवारी पांडेना न्यायालयात हजर केले होते, आणि यापुढे आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. यानंतर न्यायालयाने पांडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी आरोपी पांडे आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. यावर आज निर्णय देताना दिल्ली विशेष न्यायालयाने निर्णय देत संजय पांडे यांचा जामीन अर्ज (Bail application) फेटाळला आहे. त्यामुळं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच संजय पांडेंना १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीची हा ख्यावी लागणार आहे.