योगी आदित्यनाथ की अमित शहा? मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? (Photo Credit - X)
‘मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल?’ Who will be Modi’s Successor?
पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागा कोण घेईल, असे विचारले असता, भागवत यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाचा अंतिम निर्णय भारतीय जनता पक्ष (BJP) आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील परस्पर चर्चेनंतर घेतला जाईल. भागवत म्हणाले की, ही संपूर्ण प्रक्रिया पक्षाच्या धोरण आणि शिस्तीनुसारच असेल. त्यांनी योगी आदित्यनाथ किंवा अमित शाह यांच्यापैकी कोणाचेही थेट नाव घेतले नाही.
तमिळनाडूत RSS च्या मर्यादित उपस्थितीवर भाष्य
भागवत यांनी तमिळनाडूमध्ये आरएसएसच्या मर्यादित उपस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “राज्यात राष्ट्रवादी भावना १००% अस्तित्वात आहे, परंतु काही कृत्रिम अडथळे ही भावना पूर्णपणे प्रकट होण्यापासून रोखत आहेत.” भागवत यांनी आश्वासन दिले की, हे अडथळे फार काळ टिकणार नाहीत आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तमिळनाडूचे लोक त्यांच्या संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित आहेत आणि ही मूल्ये आणखी मजबूत करणे महत्त्वाचे आहे.
लोकांना परंपरा जपण्याचे आवाहन
आरएसएस प्रमुखांनी तमिळनाडूतील जनतेला त्यांची मातृभाषा बोलण्याचे आणि पारंपरिक जीवनशैली टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. लोक तमिळमध्ये स्वाक्षरी करण्यास का कचरतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भागवत यांनी सर्व भारतीय भाषांना समान महत्त्व दिले, कारण त्या आपल्या सांस्कृतिक ओळखीचा आणि अभिमानाचा भाग आहेत. त्यांनी दक्षिण भारतीय राज्यांच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या पारंपरिक पोशाख “वेष्टी” चे कौतुक केले. भारतीय संस्कृतीची ही विविधता जपणे आणि प्रोत्साहन देणे समाज आणि देश दोघांसाठीही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.






