IND vs BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी भारताने बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावांत गुंडाळले. मोमिनुल हक १०७ धावांवर नाबाद राहिला, तर बांगलादेशचा डाव ७४.२ षटकांत संपुष्टात आला. दुसरीकडे भारताने पहिल्या इनिंगमध्ये आपल्या नावावर विश्वविक्रम केला आहे. टीम इंडियाने सर्वात जलद हाफ सेन्च्युरी आणि सेन्च्युरी ठोकत World Record आपल्या नावावर केला आहे.
भारतीय संघाने रचला इतिहास
This is some serious hitting by our openers 😳😳
A quick-fire 50-run partnership between @ybj_19 & @ImRo45 👏👏
Live – https://t.co/JBVX2gyyPf… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/1EnJH3X5xA
— BCCI (@BCCI) September 30, 2024
उपहारानंतर बांगलादेशचा डाव घसरला
बांगलादेशने उपाहारानंतर 6 बाद 205 धावांवर खेळत असलेल्या बांगलादेशने 28 धावांत चार विकेट गमावल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने 3 तर आकाश दीप, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 बळी घेतले. यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला आणि अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावून इतिहास रचला.
पहिल्या षटकापासून आक्रमक अंदाज
होय, भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात स्फोटक फलंदाजी करताना दिसले. हसन महमूदच्या पहिल्या षटकात यशस्वी जैस्वालने 3 चौकार मारून 12 धावा केल्या, तर दुसऱ्या षटकात एकूण 17 धावा झाल्या, ज्यात रोहितच्या बॅटमधून 2 षटकार आले. पुढच्या षटकात रोहित शर्माने षटकार तर यशस्वी जैस्वालने शेवटच्या तीन चेंडूत एक षटकार आणि 2 चौकार लगावले.
सर्वात जलद अर्धशतक
अशाप्रकारे 18 चेंडूत 51 धावा झाल्या. कसोटीतील चेंडूंच्या बाबतीत हे कोणत्याही संघाचे सर्वात जलद अर्धशतक ठरले. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडने नॉटिंगहॅममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक झळकावून विश्वविक्रम केला होता. याआधीही हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. त्याने 1994 मध्ये ओव्हल मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 27 चेंडूत अर्धशतक आणि 2002 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मँचेस्टरमध्ये 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
याआधी भारताचे सर्वात जलद अर्धशतक 2008 मध्ये चेन्नई कसोटीत इंग्लंडविरुद्ध 33 चेंडूत होते. दुसरीकडे, टीम इंडियाने 11 व्या षटकात आपले शतक पूर्ण केले, ज्यासाठी एकूण 63 चेंडू खेळले गेले. हे भारताचे कसोटीतील सर्वात वेगवान शतक आहे. कर्णधार रोहित शर्मा 11 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 23 धावा करून बाद झाला, तर यशस्वी जैस्वालने भारतासाठी संयुक्त तिसरे जलद अर्धशतक झळकावले.