वैभव सूर्यवंशीने लगावले अर्धशतक (फोटो- ट्विटर)
वैभव सूर्यवंशीने लगावले आक्रमक अर्धशतक
राजस्थान रॉयल्सने केली तडाखेबंद खेळी
पॉवर प्ले मध्ये एसआरएचच्या गोलंदाजांची धुलाई
Tata IPL 2026 SRH vs RR Eliminator Live Updates: सध्या न्यू चंदीगडमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये एलिमिनेटर सामना सुरू आहे. एसआरएचने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय राजस्थान रॉयल्सने चुकीचा ठरवला आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने शानदार सुरुवात करून दिली आहे.
राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने रॉयल्सला चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने 15 बॉलमध्ये शानदार अर्धशतक लगावले आहे. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने पॉवर प्ले मध्ये तब्बल 80 रन्स लुटल्या. यशस्वी जयस्वालने त्याला चांगली साथ दिली. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आज जो संघ जिंकेल तो गुजरात विरुद्ध क्वालिफायर 2 खेळणार आहे. तसेच जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर होणार आहे.
राजस्थानची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), दासुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा/रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.
Cracking 1⃣6⃣-ball FIFTY 🔥 Vaibhav Sooryavanshi not letting us and the bowlers breathe 😅 Updates ▶️ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/4K69rWM8wZ — IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026
हैदराबादची प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल/प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन.
वैभव सूर्यवंशीने मोडला रेकॉर्ड
हैदराबादविरुद्धचा एलिमिनेटर सामना कदाचित वैभव सूर्यवंशीसाठी या हंगामातील शेवटची संधी होती, ज्याद्वारे तो गेलच्या अनेक अजरामर आयपीएल विक्रमांपैकी एक विक्रम मोडू शकणार होती आणि त्याने या संधीचे सोने केले आणि या हंगामात वैभवने कमालीची खेळी करत त्याने ख्रिस गेललादेखील मागे टाकले आहे. या हंगामात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ हॅटट्रिक साधण्यास उत्सुक असेल हे खरं असलं तरीही १५ वर्षाच्या या मुलाने नक्कीच सर्वांना रडकुंडीला आणलं आहे. वैभव आता नक्की कोणाकोणाचे रेकॉर्ड मोडणार याचीच चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.






