सध्या महाराष्ट्रात भाजप मनसे युती BJP MNS alliance होणार का? अशा चर्चा सुरु आहेत. त्यानुशंगाने दोनही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यांच्यात चर्चा होत आहेत. त्यातच मागील पंधरा दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांची दुसरी भेट असल्याने या युतीची चर्चा पुढे सरकत असल्याचं बोललं जात आहे.
परप्रांतीयांच्या मुद्द्यावर चर्चेच्या इंजीनाला लागतोय ब्रेक?
राज ठाकरे यांच्या सोबत कृष्णकुंज या निवासस्थानी ४० मीनिटं चर्चा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबद्दलची भुमीका बदलल्या शिवाय आम्ही चर्चा करु शकत नाही. मनसेच्या या भुमीकेत थोडी कटूता आहे. द्वेश आहे. जर तसं नसेल तरी तसा समज आहे. आणि हा लोकांचा समज तुम्ही दुर केला पाहिजे.”
खरंतर मराठी माणसाचे हक्क आणि त्या हक्कांवर परप्रांतीयांचे होणारे अतिक्रमण याच मुद्द्याला घेवून मनसेचा जन्म झाला. त्यामुळे आता ज्या मुद्द्यावरुन मनसेने तरुणांना आकर्षीत केले त्याच मुद्द्याला मनसे मागे सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.
शत्रुचा शत्रु तो आपला मित्र मनसेचा सध्याचा पवित्रा
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून शरद पवार Sharad Pawar यांच्या जवळ असणारे राज ठाकरे त्यांच्यापासून दुरावले. पवारांनी शिवसेनेला Shivsena आपलंसं केलं त्यामुळे भाजपापासून महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष दुरावला. त्यात मनसेने आपला झेंडा भगवा करुन हिंदुत्व स्विकारलं. आणि भाजपला मनसेत पर्यायी मित्र दिसू लागला.
त्यामुळे मनसेचा कट्टर शत्रुपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपशी युती तोडल्याने आता शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या तत्वानुसार मनसे भाजपशी जवळीक वाढवताना दिसत आहे.
“व्हाल तुम्ही महाराष्ट्राचे नेते पण वेळ लागेल” राज ठाकरेंच्या नेतृत्वावर भाजपला शंका?
माध्यमांशी दिलेल्या प्रतिक्रीयेत चंद्रकांत पाटील म्हणतात, “राज ठाकरेंबद्दल माझ्या मनात पहिल्यापासून आकर्षण आहे. त्यांचं व्यक्तीमत्व बोलण्याची पध्दत हे सारंच आकर्षक आहे. पण, तुमची राजकीय भुमीका जरा बदला की ओ.. तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले पाहिजेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यपध्दतीवर तुम्ही व्हाल महाराष्ट्राचे नेते पण त्याला वेळ लागेल. त्यामुळे मोठ्या भुमीकेत तुम्ही यायला पाहिजे. त्या भुमीकेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा एकत्र येवून लढण्याचा प्रस्ताव नाही.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
शिवसेना नही तो मनसे सही
राज ठाकरे यांनी दिलेल्या त्या सीडीचा अभ्यास करुन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना झाले आहेत. याचाच अर्थ असा की, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकांच्या तोंडावर भाजपकडून मुंबईचा बेस असलेल्या पक्षांना गळ घातली जातेय हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपकडून शिवसेना नही तो मनसे सही असं म्हणत मनसेला युतीचा प्रस्ताव दिला जावू शकतो.
त्यामुळे आता भाजपसोबत युती झाल्यावर मनसेचं इंजीन सुसाट धावणार का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.






