वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा 'या' पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी
वजन कमी करण्यासाठी उपाय?
दालचिनीचे शरीराला होणारे फायदे?
दालचिनीचे सेवन करण्याची पद्धत?
बैठी जीवनशैली, मानसिक तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. तासनतास जिम, महागडे डाएट, सप्लिमेंट्स तर काहीवेळा गोळ्या औषध घेऊन वजन कमी केले जाते. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. वजन वाढल्यानंतर शरीरसंबंधित अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. चयापचय क्रिया बिघडणे, पचनक्रिया बिघडणे इत्यादी अनेक गोष्टींवर लगेच परिणाम दिसून येतो. शरीरावर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो, तर काहीवेळा कपडे खरेदी करताना खूप जास्त गोंधळ होतो.(फोटो सौजन्य – istock)
Health Update: स्तन कर्करोग तपासणीचा गंभीर इशारा! २७ हजार महिलांपैकी १,२७६ जणींना पुढील तपासणीची गरज
वजन वाढल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागतो, ज्याच्या परिणामामुळे मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब किंवा इतर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी सप्लिमेंट्स पिण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. प्रत्येक स्वयंपाक घरात दालचिनी उपलब्ध असते. दालचिनीच्या सेवनामुळे शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होते. दालचिनीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय शरीरसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दालचिनीचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
दालचिनीचे पाणी तयार करण्यासाठी टोपात एक ग्लास पाणी घेऊन गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात दालचिनी घालून पाण्याला उकळी काढा. टोपातील पाणी अर्धा झाल्यानंतर गाळून थंड करा. तयार केलेले पाणी कोमट असतानाच प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. सकाळी उठल्यानंतर नियमित दालचिनीच्या पाण्याने सेवन केल्यास महिनाभरात पोटावर वाढलेली चरबी कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. वजन कमी करताना कायमच महागडे डाएट घेण्याची आवश्यकता नाही. साधे सोपे उपाय करून तुम्ही वाढलेले वजन कमी करू शकता. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.
मोबाईलशिवाय मुलं जेवत नाही? स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी दालचिनीच्या काढ्याचे सेवन करावे. यामुळे घशात वाढलेल्या वेदना किंवा सर्दी खोकल्यापासून सुटका मिळेल. तसेच खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन करण्यासाठी दालचिनी प्रभावी ठरते. चयापचय क्रिया चांगली राहावी यासाठी दालचिनी खाण्याचा सल्ला दिला जातो. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचा काढा नियमित प्यावा. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स तेलकट तिखट पदार्थ खाण्याच्या क्रेव्हिंग्स कमी करतात.
Ans: दालचिनी काही लोकांमध्ये संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत वजन नियंत्रणासाठी पूरक ठरू शकते.
Ans: अनेकजण सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर मर्यादित प्रमाणात दालचिनीचे पाणी घेतात. मात्र कोणता वेळ तुमच्यासाठी योग्य आहे, याबाबत डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले.
Ans: मर्यादित प्रमाणात सेवन सामान्यतः सुरक्षित असू शकते. मात्र अति प्रमाणात दालचिनीचे सेवन केल्यास काही प्रकारच्या दालचिनीतील क्यूमरिनमुळे यकृतावर विपरीत परिणाम होऊ शकतो.






