(फोटो सौजन्य – istock)
डॉक्टरांच्या मते, थंडीत आपले शरीर अंतर्गत उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्वचेभोवती रक्तवाहिन्या आकुंचन पावते. यामुळे हातांच्या आणि पायांच्या बोटांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे खाज सुटणे, वेदना आणि सूज येते. बोटांमध्ये येणारी ही सूज दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. चला याची कारणे आणि उपाय याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
रक्ताभिसरण कमी होणे
हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होत असते तेव्हा आपले अंतर्गत शरीर उष्णता साठवण्याचा प्रयत्न करत असते. यामुळे त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावरील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. जेव्हा आवश्यक प्रमाणात बोटांमध्ये रक्तप्रवाह पोहचत नाही तेव्हा ऑक्सिजनची कमतरता , सौम्य वेदना, लालसरपणा किंवा सूज येणे अशा समस्या उद्भवू लागतात. ज्या लोकांमध्ये ब्लड सर्कुलेशन आधीच कमकुवत आहे त्या लोकांमध्ये सूज येण्याच्या घटना अधिक दिसून येतात. अशा परिस्थितीत बोटांना अचानक फार उष्णता किंवा थंडी लागू देऊ नका. अशी समस्या उद्भवल्यास, हात हळूहळू गरम करा जेणेकरून रक्त प्रवाह सामान्य होईल.
पाण्याची कमतरता
हिवाळ्यात थंडीच्या वातावरणात आपल्याला तहान फार कमी लागते. शरीराला पाण्याची नितांत गरज असते पण याकाळात अनेकजण पाण्याचे सेवन फार करत नाही ज्यामुळे शरीराला हायड्रेशन मिळत नाही आणि त्वचा कोरडी होऊ लागते. यामुळे ब्लड सर्क्युलेशनची प्रक्रिया देखील मंदावते. परिणामी बोटांना जळजळ, कोरडेपणा आणि सूज येणे अशा समस्या उद्भवू लागतात.
रक्तातील साखरेचा परिणाम
डॉक्टरांच्या मते रक्तातील साखरेची समस्या असलेल्या लोकांना थंड हवामानात अनेकदा बोटांमध्ये सूज जाणवून येते. जेव्हा रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि रक्तप्रवाह मंदावतो तेव्हा बोटांमध्ये सूज दिसून येतो. थंड हवामानात थोडासाही निष्काळजीपणामुळे हातांमध्ये आणि पायांमध्ये सूज आणि जळजळ अशा समस्यांना आमंत्रण देतो. म्हणून, तुमच्या रक्तातील साखरेचे नियमितपणे निरीक्षण करा आणि तुमच्या बोटांचे थंडीपासून संरक्षण करा.
थायरॉईडचा परिणाम
थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांना थंडीत बोटांमध्ये सूज दिसून येते. थायरॉईडमध्ये शरीराचे तापमान सामान्य असते आणि थंडी नेहमीपेक्षा जास्त जाणवू लागते. अशा परिस्थितीत बहुतेक लोकांना हलक्या थंडीतही बोटांमध्ये सूज दिसून येते. यासाठी थायरॉईडची औषधे वेळेवर घ्या आणि बोटांना थंडीपासून वाचवा.
आग किंवा हीटरजवळ थेट हात गरम करू नका
अनेकजण थंडी वाजल्यानंतर किंवा बोटांना सूज दिसून आल्यानंतर हात गरम करण्यासाठी हिटरचा किंवा आगीचा वापर करतात. पण ही पद्धत एकदम चुकीची आहे. आपले शरीर थंडीतून अचानक आलेली ही उष्णता सहन करू शकत नाही ज्यामुळे त्वचा जळू लागते. यामुळे रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचते आणि त्वचेवर पुरळ उठू लागतात.
अनेक आजारांना आमंत्रण देते तुमची 6 तासांची झोप, मेंदूमध्ये जमा होऊ लागतात विषारी पदार्थ…
हिवाळ्यात बोटांना सूज येऊ नये यासाठी टिप्स






