गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी 7 सप्टेंबर रोजी गेणेशाचे आगमन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे लोकांना बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून आता बाप्पाच्या स्वागताच्या तयारींना सुरुवात झाली आहे. गणेशाच्या स्वागताच्या तयारींमध्ये नैवेद्याचे महत्त्व फार मोलाचे. बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची आपल्यात प्रथा आहे. मोदक हा बाप्पाचा सर्वात प्रिय पदार्थ असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनच त्याला त्याच्या आवडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखवला जातो.
आता काळानुसार, मोदकांचे अनेक नवनवीन प्रकार आले आहेत. मात्र तुम्ही कधी रसमलाई मोदक ट्राय केले आहेत का? रसमलाई ही एक मिठाई असुन लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही गोड मिठाई प्रत्येकाच्या आवडीची आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का आता तुम्ही यापासून मोदकदेखील बनवू शकता. हा हटके मोदक चवीला अप्रतिम लागतो. याच्या रेसिपीचा एक व्हिडिओ @sugran_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक, झटपट तयार होणारी रेसिपी
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या