श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेकजण देवाचे नामस्मरण करत व्रत करत असतात. या महिन्यात केलेल्या व्रताने प्रसन्न होऊन देव आपल्या मनोइच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. उपवास असला की, तेच तेच उपवासाचे पदार्थ आठवू लागतात जसे की, साबुदाणा खिचडी, बटाटयाची उसळ… मात्र तुम्हालाही हे बोरिंग पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी टेस्टी आणि नवीन काही खावेसे वाटत असेल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे.
संध्याकाळी अनेकदा हलकी हलकी भूक लागते. अशात तळणीचे पदार्थ अधिकतर आठवतात. मात्र जर तुम्ही उपवास करत असाल आणि तुम्हाला काही हेल्दी खायचे असेल तर तुम्ही घरी अगदी कमी वेळेत पौष्टिक मखाण्याचा चिवडा तयार करू शकता. हा चिवडा चवीबरोबरच आरोग्यसाठीही फायद्याचा ठरतो. मखाण्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरसदेखील मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे अनेक आजरांपासून दूर राहता येते. जाणून घ्या यासाठी हा चिवडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – श्रावणी सोमवाराला बनवून पहा चवदार गूळ मखाणे, फक्त 5 मिनिटांतच तयार होईल रेसिपी