चेहऱ्यावरील तेज कमी झालं आहे? मग 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब
वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. सुरकुत्या, बारीक रेषा, पिंपल्स तर काहीवेळा वांग येऊन त्वचेचे नुकसान होते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या त्वचा पूर्णपणे खराब करून टाकतात. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. फेसपॅक, फेसमास्क, क्लीनअप, फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरी बनवलेल्या नॅचरल टोनरचा वापर करावा. यामुळे त्वचा डिटॉक्स होते आणि त्वचेच्या वाढत्या समस्या कमी होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
Health Tips: 30 दिवस फक्त सॅलड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या
तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी घरी बनवलेल्या नॅचरल टोनरचा वापर करावा. यासाठी एक ग्लास पाण्यात जवसाच्या बिया, तमालपत्र, जेष्ठमध घालून मिक्स करा. तयार केलेले पाणी टोपात ओतून गरम करा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर पाणी थंड करण्यासाठी ठेवा. तयार केलेले टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून नियमित चेहऱ्यावर लावा. मॅजिकल बोटोक्स वॉटरच्या वापरामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल आणि चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल.
मॅजिकल बोटोक्स वॉटर लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहरा कोरडा करून तयार केलेले टोनर लावा आणि काहीवेळ असेच ठेवा. टोनर पूर्णपणे सुकल्यानंतर त्यावर तुमच्या आवडीचे कोणते सनस्क्रीन लावा. यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहण्यास मदत होते आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. त्वचेचे गुणवत्ता खराब झाल्यानंतर महिला वारंवार वेगवेगळे उपाय करत असतात. कधी फेशिअल केले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण यामुळे कालांतराने त्वचा अधिक निस्तेज दिसते. त्यामुळे कायमच नॅचरल प्रॉडक्टचा वापर त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी करावा.
अळशीच्या बियांमध्ये एएलए नावाचे कम्पाऊंड असते ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. तमालपत्रात असलेले अँटीऑक्सिडेंट्स आणि पॉलीफिनॉन्स घटक त्वचा आतून स्वच्छ करतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवतात. जेष्ठमधात असलेले गुणकारी घटक त्वचा अधिक स्वच्छ आणि ग्लोइंग करण्यास मदत करतात.






