सोप्या पद्धतीमध्ये बनवा आवळा कँडी
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळा मिळतो. आवळ्यामध्ये विटामिन सी आणि इतर घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारातसुद्धा आवळ्याचे सेवन करू शकता. आवळा खाल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. पण चवीला तुरट असलेले आवळा अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही आवळ्यापासून मुरंबा, आवळ्याचं लोणचं, आवळा कँडी इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता. आवळा खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते शिवाय शरीरात विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. नियमित एक आवळा खाल्यास केस गळतीची समस्या दूर होईल. आवळ्याचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
उन्हाळ्यामध्ये किंवा इतर शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामध्ये लघवी साफ न होणे, पचनाची समस्या, पोट दुखी किंवा इतर अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता. आवळा खाल्यामुळे शरीरसंबंधित अनेक आजार दूर होतात. आज आम्ही तुम्हाला बाजारातून विकत आणलेली आवळा कँडी खाण्यापेक्षा आवळा कँडी घरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा