पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! हिरव्यागार मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत चवीचे लोणचं
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला लोणचं पाहिल्यानंतर पाणी सुटते. लोणचं हा पदार्थ सगळेच खूप जास्त आवडीने खातात. चटकदार चवीचे झणझणीत लोणचं डाळभातासोबत अतिशय सुंदर लागते. जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. काहींना रोजच्या जेवणात काहींना काही झणझणीत पदार्थ हवा असतो. अशावेळी तुम्ही हिरव्यागार मिरच्यांचे आंबट तिखट लोणचं तयार करून ठेवू शकता. लोणचं मुरल्यानंतर हिरव्या मिरच्यांमधील तिखटपणा कमी होतो आणि पदार्थाची चव संतुलित राहते. हिरव्या मिरच्यांचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे लोणचं चपाती किंवा भाकरीसोबत खावे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हिरव्या मिरच्यांचा ठेचा आवडीने बनवला जातो. याशिवाय तळलेल्या मिरच्या, ताकातल्या मिरच्या, दही मिरची हे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे. चला तर जाणून घेऊया हिरव्या मिरचीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






