लहान मुलांसह मोठ्यांसाठी पोट भरेल असा पौष्टिक पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट बदामशेक
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला कुठेना ना कुठे जाण्याची घाई असते. ऑफिस, काम आणि घरातील इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संपूर्ण दिवस निघून जातो. त्यामुळे बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण नेहमी नेहमी विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडगार बदाम शेक किंवा इतर पेय प्यायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. बदाम शेक केवळ चवीसाठीच नाहीतर आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी ठरतो. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात बदाम शेक प्यायल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील. बदाम खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, मेंदूला चालना मिळते आणि स्नायू बळकट होण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा शारीरिक आरोग्य बिघडून जाते. शरीरात कायमच थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी कोणत्याही गोळ्यांचे सेवन न करता नियमित एक ग्लास बदाम शेक प्यायल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि थकवा कमी होईल. चला तर जाणून घेऊया बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी






