थंड वातावरणात शरीरसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. हातापायांमध्ये वाढलेला वेदना, अशक्तपणा, थकवा इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. याशिवाय हाडांसंबंधित वेदना वाढून शरीराला हानी पोहचते. त्यामुळे हिवाळ्यात शरीरात उष्णता टिकून रराहील अशाच पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच कायम वेगवेगळे पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमी तेच ठराविक पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मल्टीग्रेन डोसा बनवू शकता. हा डोसा बनवण्यासाठी वेगवेगळ्या डाळी आणि कडधान्यांचा वापर केला जातो. ज्वारी, नाचणी, ओट्स, मूगडाळ, उडीदडाळ इत्यादी पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया मल्टीग्रेन डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






