आमरस खाऊन वैताग आला आहे? मग झटपट हापूस आंब्यांपासून बनवा केशर आंबा कुल्फी, नोट करून घ्या रेसिपी
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस आंबे उपलब्ध होतात. हापूस आंबे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. रसाळ गोड चवीच्या आंब्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे आमरस पुरी. आंब्याच्या सीजनमध्ये आमरस पुरी नाही खाल्ली तर उन्हाळा ऋतू पूर्णपणे झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. पण नेहमीच आंब्याचा आमरस खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी आंब्यांपासून तुम्ही स्टफ्ड आंबा कुल्फी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यात झटपट तयार केलेला पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. रसाळ आंब्यांपासून बनवलेल्या कुल्फीची चव चाखल्यानंतर मन सुद्धा तृप्त होईल आणि शरीरात सुद्धा थंडावा टिकवून राहील. बाजारातून विकतचे आईस्क्रीम किंवा कुल्फी आणून खाल्ली जाते. पण विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेली स्टफ्ड आंबा कुल्फी खावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






