वेटलॉससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे कबाब, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. महागडे डाएट, तासनतास जिम तर काहीवेळा संपूर्ण दिवसभर उपवास करून दिवसभरात एखादा पदार्थ खाल्ला जातो. पण तासनतास उपाशी राहिल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे फारच आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात खाता येतील असे रताळ्याचे कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रताळी खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. रताळ्यात असलेले फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. रताळ्यांमध्ये असलेले कॉम्प्लेक्स कार्ब्स वजन कमी करण्यासाठी उत्तम मानले जातात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा रताळ्यांपासून बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Summer Special : तुम्ही कधी खाल्लाय का ‘मँगो मलाई रोल’, एकदा चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
कृती:






