मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर
वारंवार मुतखडा होण्याची कारणे?
किडनीच्या आरोग्यासाठी पौष्टिक पदार्थ?
मुतखडा झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये वेगवेगळ्या आजारांनी अनेक लोक त्रस्त आहेत. किडनी स्टोन किंवा किडनी फेल झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. काहींना वारंवार किडनी स्टोनच्या त्रासाला सामोरे जावे लागते. किडनीमध्ये खडे झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. लघवीतील कॅल्शियम, ऑक्झालेट किंवा युरिक ॲसिडचे वाढलेले प्रमाण, कमी पाणी पिणे, लठ्ठपणा आणि चुकीचा आहार इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. मूत्राशयात खडे झाल्यानंतर पोटात वारंवार वेदना होणे, लघवी करताना जळजळ होणे, पाठीमध्ये दुखणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
किडनी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. रक्त शुद्ध करणे, शरीरातील घाण स्वच्छ करणे, शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकण्याचे काम किडनी करते. पण जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे किडनीचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे शरीरात सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला वारंवार किडनी स्टोन कशामुळे होतात? किडनीचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी कोणते पदार्थ खावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास किडनीचे आरोग्य कायमच निरोगी राहण्यास मदत होईल.
लघवीत कॅल्शियम, ऑक्झालेट किंवा युरीक ॲसिडचे प्रमाण वाढल्यानंतर सिट्रेट घटकांचे प्रमाण कमी होऊन जाते. दैनंदिन आहारात कमी पाण्याचे सेवन, लठ्ठपणा, आहारात मिठाचे अतिसेवन, मांसाहाराचे जास्त सेवन, गाऊट किंवा हायपरपॅराथायरॉईडिझमसारख्या गंभीर आजारांमुळे किडनीमध्ये स्टोन वाढण्याची शक्यता असते. किडनी स्टोन झाल्यानंतर अचानक तीव्र वेदना होणे, लघवीतून रक्त पडणे, मळमळ, उलट्या, लघवी करताना जळजळ होणे तर काहीवेळा ताप येणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात.
Health Tips: 30 दिवस फक्त सॅलड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या
किडनीमध्ये वाढलेला स्टोन आणि विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबामध्ये ‘सिट्रेट’ असते, जे लघवीत खड्यांचे स्फटिक बनवण्यासाठी थांबवतात. त्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे. यामुळे शरीरात जमा झालेली विषारी घाण बाहेर पडून जाते. याशिवाय पालक, बीट, ड्रायफूट्स, चॉकलेट, चहा यामध्ये ऑक्झालेटचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे हे पदार्थ अजिबात खाऊ नये. साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील. दिवसभरात कमीत कमी ३ लिटर पेक्षा जास्त पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच किडनी आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
Ans: मुतखडा (Kidney Stone) म्हणजे किडनीमध्ये खनिजे आणि क्षार साचून तयार झालेला कठीण खडा होय.
Ans: कंबर किंवा पाठीमध्ये तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ, लघवीत रक्त येणे, मळमळ, उलट्या आणि वारंवार लघवी लागणे ही सामान्य लक्षणे आहेत.
Ans: भरपूर पाणी, लिंबूपाणी (साखर कमी किंवा न घालता), पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे-भाज्या, संत्री, मोसंबी आणि संतुलित आहार उपयुक्त ठरू शकतो. आहाराचा प्रकार स्टोनच्या प्रकारानुसार बदलू शकतो.






