फोटो सौजन्य- chatgpt
भगवान विठ्ठलांच्या गळ्यातील वैजयंती माळा ही केवळ एक अलंकार नसून श्रीविष्णूंचे दिव्य स्वरूप, विजय आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. आषाढी एकादशी शनिवार, 25 जुलै रोजी आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणून घ्या विठ्ठलांच्या या पवित्र माळेमागील धार्मिक आणि पौराणिक महत्त्व.
वैजयंती या शब्दाचा अर्थ विजय प्राप्त करून देणारी असा होतो. पुराणांनुसार ही माळ भगवान श्रीविष्णूंची अत्यंत प्रिय माळ मानली जाते. भगवान विठ्ठल हे श्रीविष्णूंचेच अवतार असल्यामुळे त्यांच्या गळ्यातही वैजयंती माळा धारण केलेली दाखवली जाते.
भगवान विठ्ठलांच्या गळ्यात दिसणारी वैजयंती माळ ही केवळ अलंकरा नसून विजय, भक्ती, पवित्रता आणि भगवान विष्णूंच्या पवित्र्याची ओळख मानली जाते. विठ्ठल हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जात असल्याने त्यांच्या गळ्यात वैजयंती माळ असते. वैजयंती या शब्दाचा अर्थ विजय मिळवून देणारी किंवा नेहमी विजयी असणारी. पुराणानुसार भगवान विष्णू नेहमी वैजयंती माळ धारण करतात त्यामुळेच विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये नेहमी ही माळ दाखवली जाते.
धार्मिक परंपरेनुसार ही माळ पाच प्रकारचया पवित्र मण्यांपासून किंवा बियांपासून तयार केली जाते. या पाच मण्यांना पंचमहाभूताच प्रतीक मानलं जातं. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश. याचा अर्थ भगवान संपूर्ण सृष्टीचे अधिपती आहेत आणि सर्व पंचमहाभूतावरती त्याचं अधिराज्य आहे. असं मानलं जातं की, भगवान विष्णूंनी असुरावरती विजय मिळवल्यानंतर वैजयंती माळ धारण केली. त्यामुळे ती धर्माच्या विजयाच आणि अधर्मावरती मात करण्याचं प्रतीक मानले जाते.
वारकरी संप्रदायात वैजयंती माळ हा केवळ दागिना नसून ती भक्ताला सांगते अहंकारावरती विजय मिळवा. लोभ, क्रोध, मत्सर यावरती नियंत्रण ठेवा. भक्ती, प्रेम आणि नामस्मरण हेच काय ते वैभव आहे म्हणूनच विठ्ठलाच्या गळ्यातील वैजयंती माळ ही आत्मिक विजयाचं प्रतीक मानले जाते. लोकपरंपरेत सांगितलं जातं एकदा देवांनी भगवान विष्णूंना विचारलं, प्रभू तुमचा सर्वांत मोठा अलंकार कोणता? भगवान विष्णू म्हणाले, माझ्या भक्तांच प्रेम हीच खरी माझ्यासाठी वैजयंती माळ आहे. ही कथा पुराणातील शब्दशः घटना नसली तरी तिचा संदेश वारकरी परंपरेशी सुसंगत आहे.
भगवंताला दागिन्यापेक्षाही भक्ती अधिक प्रिय असते. विठ्ठलांच्या गळ्यातील वैजयंती माळ ही भगवान विष्णूंच्या स्वरुपाशी, धर्माच्या विजयाशी, पंचमहाभूतांच्या एकात्मतेची आणि भक्तीच्या श्रेष्ठत्वाची प्रतीक आहे. वारकरी परंपरेत ती भक्ताला बाह्य विजयांपेक्षा स्वतःच्या मनावरती विजय मिळविण्याची प्रेरणा देणारी मानली जाते.
आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये येतात. या दिवशी भगवानांच्या गळ्यातील वैजयंती माळेचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. श्रद्धेनुसार, विठ्ठलाचे नामस्मरण आणि भक्तिभावाने दर्शन घेतल्यास जीवनात सुख, शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भगवान विठ्ठलांप्रती भक्ती, समर्पण आणि नामस्मरणाचे प्रतीक म्हणून वारकरी वैजयंती माळ धारण करतात.
Ans: ही माळ विजय, पवित्रता, पंचमहाभूतांचे संतुलन आणि भगवान विष्णूंचे प्रतीक मानली जाते.
Ans: विठ्ठल हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जात असल्याने त्यांच्या गळ्यात वैजयंती माळ दर्शवली जाते.






