किडनी खराब होण्यासाठी कोणते पेय ठरते त्रासदायक (फोटो सौजन्य - iStock)
याबाबत एम्स रुग्ण्यालयातील मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. परवेझ यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आहे. जाणून घेऊया की कोणते पेय मूत्रपिंडाचे नुकसान करू शकते. किडनी डॅमेज होण्यासाठी दारूव्यतिरिक्त कोणते पेय आहे जे त्रासदायक ठरते याबाबत अधिक माहिती घेऊया.
कोणते पेय धोकादायक आहे?
मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. परवेझ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये एनर्जी ड्रिंक्स मूत्रपिंडांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे. आजकाल, एनर्जी ड्रिंक्स लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तुम्हाला माहीत आहे का? दररोज एनर्जी ड्रिंक्स पिण्यामुळे मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते अथवा एनर्जी ड्रिंक्स नियमित पिण्यामुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त भार वाढतो.
यासंदर्भात WHO ने देखील एक इशारा जारी केला आहे. डॉ. परवेझ यांच्या मते, जागतिक आरोग्य संघटनेने देखील एनर्जी ड्रिंक्सबाबत इशारा जारी केला आहे. अशा पेयांचे सेवन करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. जर तुम्ही ते दररोज प्याल तर ते धोकादायक ठरू शकते. आधीच मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांनी एनर्जी ड्रिंक्स पिणे टाळावे.
किडनीसाठी काय फायदे आहेत?
तुमच्या किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी हे किडनीच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. तुम्ही तुमच्या आहारात आल्याचे पाणी आणि हर्बल टी देखील समाविष्ट करू शकता.
Energy Drink ने होणारे नुकसान






