उन्हाळ्यात शरीरासाठी अमृत ठरेल सत्तूचे सरबत! उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून मिळेल कायमची सुटका
कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्यासोबतच ऊर्जा सुद्धा कमी होते. सतत येणारा घाम, कडक ऊन इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सहज पचन होणाऱ्या साध्या पदार्थांचे सेवन करावे. कारण आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. ज्याच्या परिणामामुळे पोटात उष्णता वाढते आणि बद्धकोष्ठता, अपचन किंवा ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात सहज पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे.शरीराला तात्काळ ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी उन्हाळ्यात सत्तूचे सरबत प्यावे. भाजलेल्या हरभाऱ्यांपासून बनवलेले सत्तूचे सरबत शरीरात थंडावा टिकवून ठेवते आणि उष्णता नष्ट करण्यास मदत करते. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक ग्लास सत्तूचे सरबत प्यायल्यास कायमच तुम्ही निरोगी राहाल. चला तर जाणून घेऊया सत्तूचे सरबत बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)






