उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स आले आहेत? मग 'या' पद्धतीने त्वचेवर लावा चंदन
वर्षाच्या बाराही महिने काहींना शरीरात पित्त दोष किंवा वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे उष्णता वाढते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर पोटात जळजळ होणे, त्वचेमध्ये वाढलेली जळजळ किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवाला जळजळ होते. त्वचेमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, मुरूम,फोड किंवा इतर समस्या उद्भवू लागतात. या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चंदनाचा वापर करावा. मागील अनेक वर्षांपासून महिला त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चंदनाचा वापर करत आहेत. औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले चंदन त्वचा सुंदर आणि डागविरहित करण्यासाठी मदत करते. चंदनाचा लेप चेहऱ्यावर लावल्यानंतर त्वचेला अतिशय थंड वाटते.(फोटो सौजन्य – istock)
लाकड्याच्या काड्यांपासून चंदन पावडर तयार केली जाते. महागडे स्किन केअर प्रॉडक्ट, साबण, क्रीम, फेस पॅक, अगरबत्ती, अत्तर इत्यादी अनेक गोष्टी बनवण्यासाठी चंदन पावडरचा वापर केला जातो. यामध्ये जंतूनाशक, दाहशामक, थंडावा देणारे आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर न करता चंदन पावडरचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला चंदन लावण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
कोणत्याही दुकानात चंदन पावडर सहज उपलब्ध होते. वाटीमध्ये चंदन पावडर घेऊन त्यात गुलाब पाणी टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवून द्या. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.उष्णतेमुळे त्वचेवर आलेले पिंपल्स कमी होतील आणि चेहरा उजळदार दिसेल. त्वचेच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चंदन पावडरचा वापर करावा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहींची त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जाते. अशावेळी त्वचेवर वाढलेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी चंदन फेसपॅक बनवून लावावा. यामुळे त्वचेवरील तेल कमी होईल.
हानिकारक केमिकलचा वापर करून चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी चंदन पावडर, कॉफी आणि गुलाब पाण्याचा लेप तयार करावा. हा लेप संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा आणि नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवड्यातून तीनदा केल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि डागविरहित होईल. याशिवाय त्वचेच्या सर्वच समस्यांपासून सुटका मिळेल.