Mango Rice Recipe : आंब्यापासून आईस्क्रिम, ज्यूस, शेक असे अनेक पदार्थ बनवून तुम्ही खाल्ले असतील पण आंब्याचा पुलाव ही रेसिपी अनेकांना माहिती नाही. चवीला हा हलका गोड लागतो आणि उन्हाळ्यात खास करुन बनवला जातो.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
आंबा अनेकांना खायला आवडतो.
तुम्ही कधी आंब्याचा पुलाव ट्राय केला आहे का?
हा पुलाव चवीला फार अप्रतिम लागतो.
उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंब्यांचा सुगंध दरवळू लागतो. आंब्यापासून बनवलेले शेक, लस्सी, आईस्क्रीम किंवा विविध गोड पदार्थ आपण अनेकदा चाखले असतील. पण फार कमी लोकांनी आंबा पुलावाची चव चाखली आहे. हा पुलाव चवीला फार अप्रतिक लागतो. पिकलेल्या आंब्याची नैसर्गिक गोडी, सुगंधी बासमती तांदूळ आणि सुका मेव्याची कुरकुरीत चव यांचे अप्रतिम मिश्रण या पुलावात अनुभवायला मिळते. हा पदार्थ खास पाहुण्यांसाठी किंवा एखाद्या विशेष जेवणासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. शिवाय तो कमी वेळात तयार होतो आणि त्याची आकर्षक चव सर्वांनाच आवडते. चला तर मग, घरच्या घरी स्वादिष्ट आंबा पुलाव कसा बनवायचा याची रेसिपीजाणून घेऊया.