लहान मुलं फळे खायचा कंटाळा करतात? मग ड्रॅगन फ्रूट आणि जांभळाचा वापर करून झटपट बनवा Soft candy, नोट करा रेसिपी
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच फळे खायचा कंटाळा करतात. फळांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. पण दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात फळांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. फळांच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच शरीराला आणि त्वचेला आवश्यक पोषक घटक मिळतात. कायमच फळांचा ज्यूस किंवा सॅलड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही फळांपासून सॉफ्ट कँडी बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. फळांची सॉफ्ट कँडी बनवताना जांभूळ आणि ड्रॅगन फ्रुटचा वापर करावा. ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन सी आणि फोलेट इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तर जांभळांमध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे मधुमेह किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेले लोक सुद्धा सॉफ्ट कँडी खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)






