डायबिटीस रुग्णांसाठी वरदान ठरते जांभूळ (फोटो सौजन्य - iStock)
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते
जांभळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, याचा अर्थ असा की ते खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत अचानक वाढ होत नाही. याव्यतिरिक्त, जांभळांमध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन नावाची संयुगे असतात. ही संयुगे शरीरातील स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे उपाशीपोटी आणि जेवणानंतरच्या साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते
सध्या जांभळाचा हंगाम सुरू आहे आणि दररोज जांभूळ खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. यामुळे स्वादुपिंड सक्रिय होते, जे योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करते आणि पेशींना ग्लुकोज अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे अगदी डॉक्टरही रुग्णांना जांभूळ नियमित खाण्याचा सल्ला देतात.
Health Tips: डायबिटीजचे रुग्ण आहात? नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ
वारंवार लघवी होण्यापासून आराम
मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा जास्त तहान लागते आणि वारंवार लघवीला जावे लागते. आयुर्वेदानुसार, जांभळामधील मधुमेह-विरोधी गुणधर्म हे नियंत्रित करण्यास मदत करतात. आयुर्वेदातही जांभळाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यामुळे नियमित अतिरेक न करता तुम्ही रोज ४-५ जांभूळ नक्कीच खाऊ शकता आणि आपल्या डायबिटीसवर नियंत्रणही ठेऊ शकता.
हृदयाचे आरोग्य आणि वजन नियंत्रण
जांभळामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. जांभळामध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. तुम्हाला डायबिटीसच्या नियंत्रणासह वजनावरही नियंत्रण आणायचे असेल तर आपल्या फलाहारामध्ये जांभळाचा नक्की समावेश करून घ्या
डायबिटिससाठी मोठा खुलासा! फळांचा रस पिल्याने ब्लड शुगर वाढते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य
सेवनाची योग्य पद्धत आणि प्रमाण
मधुमेहाचे रुग्ण दिवसाला ८० ते १०० ग्रॅम जांभूळ खाऊ शकतात. बिया खाल्ल्यानंतर त्या फेकून देऊ नका कारण तुम्ही या बियांचाही डायबिटीससाठी उपयोग करून घेऊ शकता. या जांभळाच्या बिया वाळवून त्याची पावडर बनवा आणि सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत सेवन करा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. याचे सेवन करण्यापूर्वी आपल्या नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






