नवजात बालकांना जन्म झाल्यानंतर कावीळ का होते? मुलांच्या शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
नवजात बालकांना कावीळ का होते?
बालकांना कावीळ झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
कावीळ झाल्यानंतर उपचार?
नऊ महिने आईच्या गर्भात बाळाच्या शरीराचा विकास होतो. या कालावधीमध्ये बाळाचे सर्व अवयव हळूहळू तयार होतात. मात्र नऊ महिन्यानंतर बाळाचा जन्म होतो, त्यावेळी बहुतांश बालकांना कावीळ होते.नवजात बालकांना कावीळ झाल्यानंतर त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. जन्म झाल्यानंतर नवजात बालकांना कावीळ होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. बाळाच्या शरीरात बिलीरुबिन नावाचे पिवळे द्रव वाढल्यानंतर कावीळ होण्याची जास्त शक्यते असते. बऱ्याचदा वेळे आधीच प्रसूती झाल्यामुळे बाळाच्या शरीराचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यामुळे कावीळ किंवा इतर आजार होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नवजात बालकांना जन्म झाल्यानंतर कावीळ का होते? बालकांना कावीळ झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात आणि त्यावरील उपचार काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
बाळाच्या जन्मच्या वेळी यकृताचा पूर्णपणे विकास न झाल्यामुळे अतिरिक्त बिलीरुबिन शरीराबाहेर टाकण्यास कमी पडते, ज्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात. अविकसित यकृतामुळे लाल रक्तपेशी तुटून बिलीरुबिन तयार होते. हीच प्रक्रिया प्रौढ व्यक्तींच्या शरीरात झपाट्याने होते आणि बालकांचा योग्य विकास न झाल्यामुळे या प्रक्रियेला जास्तीचा वेळ लागतो.
लहान मुलांच्या शरीरात लाल रक्तपेशींचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे जन्मच्या पहिल्याच दिवशी शरीरात बिलीरुबिनचे उत्पादन झपाट्याने वाढल्यामुळे बाळाला कावीळ होऊ शकते. तसेच बाळ जन्माला आल्यानंतर काहीवेळा आईचे दूध बाळाला कमी पडते. बाळाला आवश्यक प्रमाणात दूध न मिळाल्यामुळे सुद्धा कावीळ होऊ शकते. सर्वसाधारण कावीळ झाल्यानंतर ती एका आठवड्यांच्या आधी बरी होते. तसेच जन्माच्या पहिल्याच दिवशी कावीळ झाल्यास डोळे व संपूर्ण शरीर खूप पिवळे पडल्यासारखे वाटू लागते. अशावेळी अंगावर न काढता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. तसेच नवजात बालकांना कावीळ झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला निळ्या रंगाच्या विशेष प्रकाशाखाली ठेवले जाते, यामुळे शरीरातील अतिरीक्त बिलीरुबिन सहज नष्ट होण्यास मदत होते.
बाळाच्या डोळ्यांचा पांढरा भाग आणि त्वचा पिवळी पडणे
बाळ खूप झोपाळू होणे व्यवस्थित दूध न पिणे
बाळाची लघवी गडद पिवळी
वजन न वाढणे.
Ans: कावीळ ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये बाळाच्या रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढते आणि त्वचा तसेच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसू लागतो.
Ans: जन्मानंतर बाळाचे यकृत पूर्णपणे विकसित झालेले नसते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त बिलिरुबिन योग्यरित्या बाहेर टाकले जात नाही आणि कावीळ होऊ शकते.
Ans: अतिशय सुस्ती, सतत रडणे, स्तनपान करण्यास नकार देणे, ताप येणे किंवा पिवळेपणा वाढत जाणे ही गंभीर लक्षणे मानली जातात.






