Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today:  सुनेत्रा पवारांच्या जागेसाठी नवनीत राणा इच्छुक, पवारांची घेतली भेट

Maharashtra Breaking News: या २४ मुख्य जागांव्यतिरिक्त दोन महत्त्वाच्या जागांसाठी पोटनिवडणूक (Bye-election) देखील याच दिवशी होणार आहे. महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी आणि तामिळनाडूमधील एका जागेसाठी ही पोटनिवडणूक घेतली जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 18, 2026 | 11:56 AM
Top Marathi News Today Live

Top Marathi News Today Live

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

Rajya Sabha Election 2026 Maharashtra: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या २४ रिक्त जागांसाठी आणि महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकीसाठी अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेमुळे देशातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व जागांसाठी आगामी १८ जून २०२६ रोजी मतदान पार पडणार असून, त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करून निकाल देखील घोषित केले जाणार आहेत.

१० राज्यांतील २४ जागांचा समावेश

जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार, देशातील १० राज्यांमधील २४ राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील राज्यांचा समावेश आहे:

  • ४ जागा प्रत्येकी: आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक
  • ३ जागा प्रत्येकी: राजस्थान आणि मध्य प्रदेश
  • २ जागा: झारखंड
  • १ जागा प्रत्येकी: मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम

 

The liveblog has ended.
  • 07 Jun 2026 04:10 PM (IST)

    07 Jun 2026 04:10 PM (IST)

    LPG Gas घेऊन येणारी जहाजं अडकली होर्मुझच्या सामुद्रधुनीत? आता भारतात गॅस पुरवठा खंडित होणार?

    अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हल्ले करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने या मार्गाची नाकेबंदी करण्याची घोषणा केली; हा मार्ग जगातील सुमारे २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. इराणकडून करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठांमध्ये बरीच खळबळ उडाली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी सरकारे आणि जहाजवाहतूक कंपन्यांना नवीन धोरणे आखावी लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून दरांमध्येदेखील बरीच वाढ झाली आहे. वाचा सविस्तर...

  • 05 Jun 2026 06:00 PM (IST)

    05 Jun 2026 06:00 PM (IST)

    बापरे… इतकी कमाई! Gautam Adani यांनी रचला इतिहास

    Gautam Adani Per Day Earning: २०२६ मध्ये सुरुवातीपासून बऱ्याच उलथापालथ होत असताना मात्र हे वर्ष उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरलेलं पाहायला मिळत आहे. त्यात मात्र मुकेश अंबानी यांना मात्र त्यात तोटा सहन करावा लागला आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’च्या एका ताज्या अहवालातून हे महत्त्वाची बाब समोर आली आहे. या वर्षी गौतम अदानी यांनी दररोज सरासरी आकडा कोटींमध्ये जात आहेय. नेमका किती आहे हा आकडा आणि मुकेश अंबानी किती पिछाडीवर पडलेत सविस्तर पाहूयात.

  • 05 Jun 2026 05:45 PM (IST)

    05 Jun 2026 05:45 PM (IST)

    PAK vs AUS: कांगारू ढेपाळले! पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

    ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने पराभव केला. गद्दाफी स्टेडियमवर, कांगारू फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजांसमोर सहज गारद झाले आणि संपूर्ण संघ केवळ १५७ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने ४१.५ ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून १५८ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. निर्णायक सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. हा विजय पाकिस्तानसाठी अत्यंत खास मानला जात आहे.

  • 05 Jun 2026 05:30 PM (IST)

    05 Jun 2026 05:30 PM (IST)

    विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांची काँग्रेस पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी

    राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. गुरुवारी (४ जून) विधान परिषद निवडणुकीतुन अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी येत असून निवडणुकीतून अर्ज माघारी घेतल्याच्या कारणावरून दोन उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धण सपकाळ यांनी हि माहिती दिली आहे. साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल या काँग्रेस उमेदवारांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने पक्षाकडून हि मोठी कारवाई करण्यात आली आहे.

  • 05 Jun 2026 05:13 PM (IST)

    05 Jun 2026 05:13 PM (IST)

    MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागणार?

    Maharashtra ST News Marathi : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी पुढील काळात प्रवास खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी वाढत्या इंधन दर, देखभाल खर्च आणि परिचालन खर्चाचा दाखला देत एसटी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लाखो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 05 Jun 2026 04:56 PM (IST)

    05 Jun 2026 04:56 PM (IST)

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आऊट ऑफ सिलेबस’ चित्रपटाच्या टीमचा हरित उपक्रम; वृक्षारोपणातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

    जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आगामी मराठी चित्रपट ‘Out of Cyllabus’च्या टीमने एक स्तुत्य उपक्रम राबवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. चित्रपटाच्या कलाकारांसह निर्माते आणि संपूर्ण टीमने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष स्वागत केले.

  • 05 Jun 2026 04:48 PM (IST)

    05 Jun 2026 04:48 PM (IST)

    IND vs AFG: टीम इंडियातून Rishabh Pant ची हकालपट्टी का झाली? गौतम गंभीर यांचा मोठा खुलासा

    भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलला कसोटी उपकर्णधारपदी नेमण्यावर अखेर मौन सोडले आहे. गंभीर यांनी विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. न्यू चंदीगड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीर यांनी यावर अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी, ऋषभ पंत हा संघातील वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे आणि अनुभवी फलंदाजांनी सामन्याची परिस्थिती समजून घेऊन जबाबदारीने खेळले पाहिजे, असे ते म्हणाले.

  • 05 Jun 2026 04:37 PM (IST)

    05 Jun 2026 04:37 PM (IST)

    UP Elections 2027: 2024 मधून घेतला धडा; यूपी जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन,1.76 लाख बूथ पालक, 27,633 शक्ती केंद्रांवर विशेष फोकस

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका अजून जवळपास एक वर्ष दूर असल्या तरी, पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या सूक्ष्म-व्यवस्थापन मॉडेलच्या (मायक्रो-मॅनेजमेंट मॉडेल) यशाने प्रोत्साहित होऊन, भाजप आता उत्तर प्रदेशात त्याची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्याची योजना आखत आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून, पक्षाने राज्यभरात अंदाजे १.७६ लाख ‘बूथ प्रभारी’ नियुक्त करण्याचा आणि तळागाळातील संघटना सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 05 Jun 2026 04:25 PM (IST)

    05 Jun 2026 04:25 PM (IST)

    CJP प्रमुख अभिजीत दीपकेंचा नवा व्हिडिओ; ‘विमानतळाऐवजी थेट पोलीस ठाण्यात’ येण्याचे आवाहन

    कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी ६ जून रोजी भारतात परतण्यापूर्वी केलेल्या आपल्या पूर्वीच्या आवाहनावरून यू-टर्न घेतला आहे. त्यांनी ४ जून रोजी रात्री १० वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी करून समर्थकांना दिल्ली विमानतळावर न येण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी, त्यांनी स्वतःच समर्थकांना विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन केले होते. पण सुरक्षेच्या कारणास्तव आणि इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, यामुळे अभिजीत दिपके यांनी त्यांच्या समर्थकांना विमानतळावर न येण्याचे आवाहन केलं आहे. गुरूवारी सायंकाळी एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी, "मी स्वत: पार्लमेंट रस्त्यावरील पोलीस ठाण्यात जाणार आहे. तुम्हीही तिथेच या. पोलिसांची परवानगी घेऊन आपण जंतर मंतरवर एकदम शांततेत आपले आंदोलन करूयात." असं म्हटलं आहे.

  • 05 Jun 2026 04:16 PM (IST)

    05 Jun 2026 04:16 PM (IST)

    बिनविरोधची धडपड, माघारनाट्य आणि १५० कोटींचा घोडेबाजार, संजय राऊतांचे महायुतीवर गंभीर आरोप; भाजपचा पलटवार

    विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणुक अर्ज माघारी घेतल्याने १७ पैकी ५ जागा महायुतीने बिनविरोध मिळवल्याचे दिसत आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले. संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून यावर भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान १५० कोटी रुपये खर्च झाले! विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे, कोकण, छ.संभाजी नगर, पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत,” अश्या शब्दात त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

  • 05 Jun 2026 03:57 PM (IST)

    05 Jun 2026 03:57 PM (IST)

    Hormuz वरुन ट्रम्प यांचा कडक इशारा

    Trump on Hormuz : वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा होर्मुझ सामुद्रुधीनवरुन मोठे विधान केले आहे. होर्मुझच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, होर्मुझ मार्ग सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेला कोणत्याही युरोपीय देशाच्या मदतीची गरज नाही. अमेरिका एकटीच होर्मुझची संरक्षण करण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर

  • 05 Jun 2026 03:48 PM (IST)

    05 Jun 2026 03:48 PM (IST)

    ट्रम्प इराणच्या सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याशी भेटण्यास उत्सुक?

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची भेट घेण्यास तयारी दर्शवली आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिका-इराणमध्ये करार झाल्या मी त्यांची भेट घेऊ शकतो.

     

     

  • 05 Jun 2026 03:43 PM (IST)

    05 Jun 2026 03:43 PM (IST)

    भारतात प्लॅस्टिक नोटा आणण्याबाबत RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचं मोठं विधान

    Polymer Currency: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यात रेपो दर स्थिर ठेवला असल्याबाबत महत्त्वाची बातमी दिली. या सोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाची बातमी जाहीर केली. सध्या चर्चा सुरु असलेल्या प्लास्टिकच्या नोटांबाबत त्यांनी नुकताच खुलासा केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशात पॉलिमर चलनी नोटा आणण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, हा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यावर आहे. त्यात त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की यापूर्वीही प्लास्टिकच्या नोटा आणण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु ते प्रयत्न यशस्वी ठरले नव्हते. नेमकं काय घडलं होतं तेव्हा? सविस्तर समजून घेऊयात.

  • 05 Jun 2026 03:38 PM (IST)

    05 Jun 2026 03:38 PM (IST)

    कंगनाच्या नव्या सिनेमात झळकणार मराठी रणरागिण्या

    अगदी दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगनाचा नवा कोरा सिनेमा ‘भारत भाग्य विधाता’ चा अधिकृत ट्रेलर लाँच करण्यात आला. सिनेमा मुंबईमध्ये झालेल्या 26/11 दुर्घटनेवर आधारित आहे. मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांनीही घुसखोरी केली होती. या हल्ल्यात मोठी जीवित हानी झाली होती. अशामध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या काही Nurses यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून हॉस्पिटलातील रुग्णांचे जीव वाचवणे त्यांचे कर्तव्य समजून हल्ल्याला सामोरे गेले. त्यांचे योगदान फार मोठे आहे. हेच योगदान मोठ्या पडद्यावर आणण्याचे कार्य दिग्दर्शक मनोज टपरीया आणि सहनिर्माता मणिकर्णिका फिल्म्सने केले आहे. वाचा सविस्तर

  • 05 Jun 2026 03:33 PM (IST)

    05 Jun 2026 03:33 PM (IST)

    मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन

    आपण कसे वागतो यावरुन आपली ओळख होत असते. लहान मुलांनी चुका केल्या की समोरच्या व्यक्तीकडून ओरडा थेट त्याला दिला जात नाही तर आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर टिका केली जाते. लहानपणी आपण या गोष्टीचा अनुभव नक्कीच घेतला असेल. याचप्रमाणे, जेव्हा आपण परदेशात जातो किंवा आपल्या देशात आलेल्या परदेशी नागरिकांशी कसे वागतो, यावरून केवळ आपलेच नव्हे तर संपूर्ण देशाचे मूल्यांकन केले जाते. वाचा सविस्तर

  • 05 Jun 2026 03:27 PM (IST)

    05 Jun 2026 03:27 PM (IST)

    प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार; पीडितेला लॉजवर नेलं अन्…

    नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न केला जात आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता दत्तमंदिर रोड परिसरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर

  • 05 Jun 2026 03:23 PM (IST)

    05 Jun 2026 03:23 PM (IST)

    El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली! पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ; भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?

    El Nino News in Marathi : जगावर पुन्हा एकदा मोठे संकट घोंगावत आहे. प्रशांत महासागराती तापमान वाढले असून अल निनो च्या हवामान बदलामुळे चिंता निर्माण झाली आहे. याचा परिणाम भारतीय तपामानावरही होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. युरोपीय हवामान संस्थेने याबाबत एक महत्त्वपूर्ण अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, समुद्राचे तापमान एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त वाढले आहे. यामुळे जुलै महिन्यात अल निनो येण्याची शक्यात ८२% वाढली आहे. वाचा संपूर्ण अपडेट

  • 05 Jun 2026 03:18 PM (IST)

    05 Jun 2026 03:18 PM (IST)

    पुण्यात LPG सिलेंडरच्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू

    पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी (०५ जून) सकाळी खांडवे नगर परिसरात एका घरात एलपीजी सिलेंडराच भीषण स्फोट झाला. सिलेंडर बदलत असताना ही घटना घडली. या भीषण दुर्घटनेच दोन जण गंभीर भाजले होते. त्यांना तातडीने रुग्णालयता दाखल करण्यात आले परंतु उपारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये आणखी एक व्यक्ती गंभीर भाजली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

  • 05 Jun 2026 03:12 PM (IST)

    05 Jun 2026 03:12 PM (IST)

    गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड

    राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभागाने अवैध मद्यविक्री आणि वाहतुकी विरोधात धडक कारवाई करत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उधळून लावली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, मद्यसाठा, चारचाकी वाहन आणि मोबाईलसह सुमारे 6 लाख 98 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाटस- दौंड अष्टविनायक रोडवरील बेटवाडी हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.

  • 05 Jun 2026 03:07 PM (IST)

    05 Jun 2026 03:07 PM (IST)

    नागपूर विधान परिषदेला ‘बिनविरोध’चा फॉर्म्युला अपयशी

    Nagpur Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखेरपर्यंत केलेली विनवणी निष्फळ ठरली. गुरुवारी अखेरच्या दिवशी काँग्रेसच्या डमी उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने महायुतीकडून भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि महाआघाडीकडून काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होणार आहे. वाचा सविस्तर

  • 05 Jun 2026 03:00 PM (IST)

    05 Jun 2026 03:00 PM (IST)

    मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी राज्य सरकारकडून मान्य

    मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील एका मागणीला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसदारांना एकूण ३ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. आठ जिल्ह्यांमधील ३४ मृत आंदोलकांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

  • 05 Jun 2026 02:59 PM (IST)

    05 Jun 2026 02:59 PM (IST)

    एमआयडीसी व विमानतळाविरोधात गडचिरोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा कुटुंबांसोबत ठिय्या

    गडचिरोली तालुक्यात प्रस्तावित विमानतळ आणि चामोर्शी तालुक्यात एमआयडीसीसाठी शेकडो हेक्टर सुपीक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भूमी अधिग्रहणामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या 20 हून अधिक गावातील हजारो शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत आज कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक दिली आणि बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे. या शेतकऱ्यांचा रात्रीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून शेकडो महिला आणि पुरुष शेतकरी रस्त्यावर झोपून घेतलं आहे. शासनाने काढलेला भूमि अधिग्रहणाचा जीआर रद्द करावा अन्यथा जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही ठिय्या आंदोलनातून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

  • 05 Jun 2026 02:40 PM (IST)

    05 Jun 2026 02:40 PM (IST)

    हमासच्या नेत्यांचे पाकिस्तान, बांगलादेश दौरे कमालीचे वाढले; इस्रायलच्या दाव्याने इराण युद्धाचा तणाव आणखी वाढला

    भारतातील इस्रायलचे राजदूत रियुवेन अझार यांनी पाकिस्तानवर अत्यंत गंभीर आणि थेट शब्दांत निशाणा साधला आहे. पाकिस्तान हा एक अत्यंत समस्याग्रस्त देश असून प्रादेशिक वादांमध्ये मध्यस्थ म्हणून त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असे अझार यांनी म्हटले आहे. राजदूत रियुवेन अझार यांनी मुलाखतीदरम्यान "गेल्या काही महिन्यांत दहशतवादी संघटना 'हमास'च्या नेत्यांचे पाकिस्तान आणि बांगलादेशमधील दौरे कमालीचे वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात जर एखादा मध्यस्थ देश कोणत्याही एका बाजूच्या अतिशय जवळचा असेल, तर तिथे शांततेची चर्चा होणे अशक्य असते. इस्रायल सध्या ज्या सुरक्षा आव्हानांचा आणि संकटांचा सामना करत आहे, ते भविष्यात इतर देशांसमोरही उभे राहू शकतात, त्यामुळे जगाने यातून धडा घेण्याची गरज आहे.

  • 05 Jun 2026 02:29 PM (IST)

    05 Jun 2026 02:29 PM (IST)

    डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात नाराजीचा स्फोट, खातेवाटपावर नाराज रामलिंगा रेड्डी देणार राजीनामा

    कर्नाटकात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर, आता खात्यांचे वाटप होताच काँग्रेसमध्ये उघडपणे असंतोष पसरला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आठ वेळा आमदार राहिलेले रामलिंगा रेड्डी हे त्यांना मिळालेल्या खात्यामुळे प्रचंड नाराज असल्याचे वृत्त आहे. नव्या कॅबिनेटमध्ये रेड्डी यांच्याकडे 'बृहद आणि मध्यम जलसंधारण' विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

  • 05 Jun 2026 02:20 PM (IST)

    05 Jun 2026 02:20 PM (IST)

    Abhijeet Dipke : 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेतून भारतासाठी रवाना

    सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेतून भारतासाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत शनिवार 6 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या विरोध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ते भारतात येत आहेत. भारतासाठी निघण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असून, "मी भारतासाठी निघालो आहे. मी माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, जय भीम!" असे त्यांनी म्हटले आहे.

  • 05 Jun 2026 02:11 PM (IST)

    05 Jun 2026 02:11 PM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी अन् सरकारचा केला निषेध

    जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील सातोना इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. या कर्जमाफीच्या शासन निर्णया मधील जाचक अटीमुळे फक्त 5 टक्के शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरणार आहेत. उर्वरित 95 टक्के शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी योजना नसून ही कर्ज वसुली योजना असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

  • 05 Jun 2026 02:00 PM (IST)

    05 Jun 2026 02:00 PM (IST)

    Konkan BJP : महावितरण अधिकारी मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही अन् तोंडाला काळे फासू

    कल्याण डोंबिवलीत सातत्याने विजेच्या लपंडावून सुरू आहे. राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट असताना या भागातील नागरिकांना वारंवार वीज खंडितीचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक वेळा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. महावितरणने तक्रारींसाठी प्रसारित केलेले दूरध्वनी क्रमांक अनेकदा प्रतिसाद देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. अधिकाऱ्यांची सहकार्याची भूमिका नसेल तर त्यांना मार खावा लागेल एवढेच नाही तर महावितरण कडून सुधारणा झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

  • 05 Jun 2026 01:50 PM (IST)

    05 Jun 2026 01:50 PM (IST)

    महागाई वाढणार, विकासदर घटणार; नेमका काय परिणाम होणार?

    RBI ने का वाढवला महागाई दर?

    कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा दबाव – पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव चढेच राहिले आहेत; याचा परिणाम म्हणून भारतात इंधन आणि वाहतूक खर्चात वाढ होऊ शकते.
    डॉलरचे बळकटीकरण – अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य अलीकडेच घसरल्यामुळे, भारतासाठी जीवनावश्यक वस्तूंची आयात करणे अधिक महाग झाले आहे.
    हवामान आणि कृषी उत्पादन – प्रचंड उष्णता आणि मान्सूनबाबतची अनिश्चितता यामुळे कडधान्ये आणि भाज्यांसारख्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

  • 05 Jun 2026 01:40 PM (IST)

    05 Jun 2026 01:40 PM (IST)

    बालभारतीने नवीन पुस्तकांमध्ये नक्की काय बदल केले?

    इयत्ता दुसरी आणि तिसरीच्या पुस्तकांच्या छपाईचे काम पूर्ण झाले असून या पुस्तकांचे वितरण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी – पालकांना ही पुस्तके १० जूननंतर ती खरेदी करण्यास उपलब्ध होतील. चौथीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांव्यतिरिक्त इतर काही माध्यमांच्या पुस्तकांच्या छपाईचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या इयत्तेची पुस्तके जूनच्या आसपास विद्यार्थ्यांना मिळतील. ही पुस्तके कमी कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बालभारती नेहमी प्रयत्नशील असते. एससीईआरटीकडून सेतू अभ्याक्रम निर्मितीची प्रक्रिया सुरू असून हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवून पूर्ण होईपर्यंत सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली असतील.

  • 05 Jun 2026 01:30 PM (IST)

    05 Jun 2026 01:30 PM (IST)

    भारतानंतर पाकिस्तानवरही पुतिनकडून कौतुकांचा वर्षाव

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरुन कौतुक केले. यानंतर त्यांनी पाकिस्तानची स्तुती केली आहे. सेंट पीटर्सबर्ग येथे पत्रकारांशी बोलताना पुतिन यांनी यांनी पाकिस्तानला एक मोठा देश संबोधले. तसेच त्यांनी त्याच्या चीनसोबतच्या संबंधावरही भाष्य केले. ज्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 05 Jun 2026 01:20 PM (IST)

    05 Jun 2026 01:20 PM (IST)

    हिमालयात 8.7 किमीचा बोगदा खणून भारत बदलणार नद्यांचा प्रवाह, पाकिस्तान बॅकफूटवर

    भारत आणि पाकिस्तान (India-Israel Relations) यांच्यातील राजनैतिक तणाव आता एका नव्या आणि अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पोहोचला आहे. यावेळी वादाचे कारण सीमा नसून थेट ‘पाणी’ आहे. भारताने हिमाचल प्रदेशातील लाहौल खोऱ्यात कोक्सार (Koksar) जवळ चिनाब नदीवर एक भव्य धरण आणि ८.७ किलोमीटर लांबीचा ‘चिनाब-बियास लिंक बोगदा’ बांधण्याचा मेगा प्लॅन तयार केला आहे. या प्रकल्पाची सार्वजनिक निविदा (Public Tender) समोर येताच पाकिस्तानने यावर अतिशय तीव्र आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय जल कायद्यांचे आणि ऐतिहासिक सिंधू पाणी कराराचे (Indus Waters Treaty) गंभीर उल्लंघन म्हटले आहे. भारताच्या या एका पावसामुळे पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा मोडू शकतो, अशी भीती तिथल्या तज्ज्ञांना वाटत आहे.

  • 05 Jun 2026 01:10 PM (IST)

    05 Jun 2026 01:10 PM (IST)

    नितीन नबीन यांनी मंजूर केला अण्णामलाई यांचा राजीनामा

    तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी राजीनामा दिला होता. आता हा राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंजूर केला आहे. अण्णामलाई यांना तामिळनाडूच्या राजकारणात स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले आहे.

  • 05 Jun 2026 01:02 PM (IST)

    05 Jun 2026 01:02 PM (IST)

    चंद्रकांत पाटील यांच्याकडून अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली

    ज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज भोर येथे जाऊन दिवंगत अनंतराव थोपटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अनंतराव थोपटे यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. भोर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोपटे कुटुंबियांची, प्रामुख्याने त्यांचे सुपुत्र माजी आमदार संग्राम थोपटे व इतर सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

  • 05 Jun 2026 01:00 PM (IST)

    05 Jun 2026 01:00 PM (IST)

    उमेदवाराच्या माघारीनंतर सोनललक्ष्मी घाग यांची तीव्र प्रतिक्रिया

    स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराने घेतलेली माघार ही महाविकास आघाडीसाठी धक्कादायक असून मित्र पक्ष व मतदारांच्या विश्वासाला तडा देणारी घटना आहे. महायुतीकडे आधीच पुरेसे संख्याबळ आणि मतदारांचे समर्थन असताना विरोधी पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडणे. हा भाजपचा हतबलतेतून केलेला राजकीय डाव असल्याचे दिसून येते. ही जागा काँग्रेस पक्षाकडे असती, तर विजय-पराजयाची चिंता न करता काँग्रेसने ही निवडणूक ताकदीने लढवली असती, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी दिली आहे.

  • 05 Jun 2026 12:48 PM (IST)

    05 Jun 2026 12:48 PM (IST)

    पोलिसांनी ‘थिंकटेक’च्या मालकाला नाशिकमधून पकडले

    हिंजवडीतील थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रातोरात टाळे ठोकून शेकडो आयटी अभियंत्यांना बेरोजगार करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अखेर अटक करण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ हर्षल ठाकरे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या, तरी संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

  • 05 Jun 2026 12:24 PM (IST)

    05 Jun 2026 12:24 PM (IST)

    महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त

    घरगुती गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात असताना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने खराबवाडी येथे छापा टाकून तब्बल ८१ गॅस सिलिंडर जप्त केले. या कारवाईत एक लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 05 Jun 2026 12:20 PM (IST)

    05 Jun 2026 12:20 PM (IST)

    नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल भारत दौऱ्यावर

    भारत आणि नेपाळ (nepal) या दोन शेजारी राष्ट्रांमधील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक संबंध नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल ५ जूनपासून भारताच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या विशेष निमंत्रणावरून आयोजित करण्यात आलेला हा दौरा दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नेपाळमधील अलिकडच्या राजकीय परिवर्तनानंतर आणि नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा पहिलाच मोठा उच्चस्तरीय अधिकृत भारत दौरा असल्याने याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.

  • 05 Jun 2026 12:12 PM (IST)

    05 Jun 2026 12:12 PM (IST)

    सिल्लोडमधील संतापजनक प्रकार

    पहाटे तीन वाजेच्या सुमारास विवाहीतेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १४ हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी ३ जून रोजी ठोठावली आहे. विशेष म्हणजे ठोठावलेल्या दंडाच्या रक्कमेतील १० हजार रुपये हे पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे देखील आदेशात नमुद करण्यात आले आहे. मन्सूरखान मज्जुखान पठाण (२५, रा. सिल्लोड) असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. या प्रकरणात २३ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार, १३ मार्च २०२३ रोजी पहाटे तीन वाजता मन्सूरखान पठाण याने पीडितेच्या घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच तो घरात घुसला. त्याने महिलेचा विनयभंग केला. पीडिता ओरडल्याने तिचा पती जागा झाला. त्यावेळी आरोपीने पतीचा गळा दाबून मारहाण केली व कोणाला काही सांगितल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत पसार झाला. याबाबत पीडितेने १४ मार्च रोजी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर १६ मार्च २०२३ रोजी दिलेल्या पुरवणी जबाबात पीडितेने आरोपीने घरात घुसल्यानंतर तिला पलंगावर पाडून तोंड दाबले व जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे सांगितले. त्याचवेळी तिचा पती जागा झाल्यावर आरोपीने त्यालाही मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यानंतर १६ मार्च २०२३ रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 05 Jun 2026 12:00 PM (IST)

    05 Jun 2026 12:00 PM (IST)

    पावसासाठी घोड्यांची भन्नाट तयारी! शिमल्याच्या रस्त्यांवर रेनकोट घालून फिरले, दृष्य पाहून नेटकरी झाले खुश; Video Viral

    पावसाच्या आगमनतेची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. देशाच्या अनेक भागांत पावसाची रिमझिम सुरुवात झाली असून याच पार्श्वभूमीवर आता सोशल मिडियावर एक रंजक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ हिमालच प्रदेशातील शिमला येथील असल्याची माहिती आहे. शिनिवारी ४ जून पासून राज्याच पावसाची हजेरी लागली ज्यामुळे स्थानिकांची पावसासाठीची लगबग सुरु झाली. कुणी पावसाळी चप्पल घेण्याच्या तयारीत तर कुणी छत्री पण सोशल मिडियावर लक्षणीय ठरले ते शिमल्याच्या रस्त्यांवरील अनोखे दृष्य.

  • 05 Jun 2026 11:50 AM (IST)

    05 Jun 2026 11:50 AM (IST)

    लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral

    Stunt Video Viral : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रसिद्धसाठी,लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक कोणत्याही थराला जात आहे. लोकांना आपल्या जीवाची पर्वाही राहिलेली नाही. सध्या असाच एक धक्कादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणाने पेट्रोल आणि आगीसोबत धोकादायक स्टंट केला, ज्यामुळे काही क्षणातच भीषण दुर्घटना घडली आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

  • 05 Jun 2026 11:45 AM (IST)

    05 Jun 2026 11:45 AM (IST)

    Satara News: प्रतापगड १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल जमा करणार :सौरभ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

    जावली तालुक्याचा मानबिंदू असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आगामी सन २०२६-२७ चा गाळप हंगाम सहयोगी तत्त्वावर चालवून यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ पूर्णपणे प्रयत्नशील आहे. तसेच, हंगाम सन २०२५-२६ मधील गाळप झालेल्या ऊसाची बिले १५ जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जातील, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रतापगड सहकारी कारखाना गेली तीन वर्षे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत होता. मात्र, आगामी सन २०२६-२७ च्या हंगामापासून अजिंक्यतारा साखर कारखाना हा सदरचा करार सामंज्यसाने संपुष्टात आणणार असल्याने प्रतापगड कारखाना मूळ व्यवस्थापनाच्या ताब्यात देत आहे.

  • 05 Jun 2026 11:40 AM (IST)

    05 Jun 2026 11:40 AM (IST)

    आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न…

    उत्तर प्रदेशची राजधानी लखनाैमधून हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ट्विशा शर्मा प्रकरण चांगलंच तापलेलं असतानाच सोशल मिडिया इन्फ्लुएंसर मानसी राजपूतच्या मृत्यूने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. सासरच्या घरी तिचा मृतदेह आढळला. मानसीच्या कुटुंबाने आरोप केला होता की, लग्नावेळी सासरच्या मंडळींनी रोखरक्कम देण्यात आली होती पण त्यावरही जेव्हा त्यांच समाधान झालं नाही तेव्हा त्यांनी आणखी पैशांसाठी मानसीचा छळ करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात कुटुंबाने एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • 05 Jun 2026 11:35 AM (IST)

    05 Jun 2026 11:35 AM (IST)

    Top 5 Management Colleges: एमबीए करायचंय? प्रवेश घेण्यापूर्वी जाणून घ्या देशातील टॉप ५ मॅनेजमेंट कॉलेजेसची यादी!

    Top 5 Management Colleges In India:  इंडियन इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क २०२६ (IIRF 2026) ने देशातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांची रँकिंग जाहीर केली आहे. ही रँकिंग वेगवेगळ्या कोर्सेसनुसार दिली आहे. यामध्ये आयआयएम अहमदाबादने अव्वल स्थान पटकावले आहे. अशा परिस्थितीत मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी या टॉप ५ कॉलेजसबद्दल तुम्हाला माहिती असेले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया, मॅनेजमेंट क्षेत्रातील टॉप ५ कॉलेजेसची यादी…..

  • 05 Jun 2026 11:30 AM (IST)

    05 Jun 2026 11:30 AM (IST)

    सोसायटीमध्ये ऑईल पेंटची पांढरी पट्टी, Prasad Vedpathakने व्हिडिओ शेअर करत जैन समाजाला समजावून सांगण्याचं केलं आवाहन….

    सोशल मीडियावर ‘प्रसिका’ म्हणून लोकप्रिय असलेल्या Prasad Vedpathak आणि Deepika Vedpathak या दाम्पत्याचा मोठा चाहता वर्ग आहे. “नमस्कार मंडळी, या जेवायला…” या त्यांच्या खास शैलीमुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले आहेत. खाद्यसंस्कृती, कौटुंबिक जीवनशैली आणि दैनंदिन अनुभवांवर आधारित त्यांच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर मोठी पसंती मिळते. त्यामुळे ‘प्रसिका’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या प्रत्येक पोस्ट आणि व्हिडीओची चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. मात्र, नुकताच Prasad Vedpathak ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.Prasad Vedpathak ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या सोसायटीतील एका प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

  • 05 Jun 2026 11:25 AM (IST)

    05 Jun 2026 11:25 AM (IST)

    नसरापूरप्रकरणी मोठी अपडेट समोर; 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवल्यानंतर आता…

    नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी गुरूवारी (दि. ४) विशेष न्यायालयात सुनावणी झाली. या झालेल्या सुनावणीदरम्यान सात वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आत शुक्रवारी (दि.5) न्यायवैद्यक विज्ञानतज्ञांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याच्याविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या संवेदनशील खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध १ हजार १०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची विशेष न्यायालयात नियमित इन-कॅमेरा सुनावणी सुरू आहे.

  • 05 Jun 2026 11:20 AM (IST)

    05 Jun 2026 11:20 AM (IST)

    राक्षसी बॅटरी अन् दमदार कॅमेरा… नव्या Xiaomi स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, डिझाईनने जिंकलं यूजर्सचं मन

    Xiaomi Smartphone Launched: टेक कंपनी Xiaomi ने भारतात Xiaomi 17T हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने शाओमी 17 सिरीजमधील लेटेस्ट मॉडेल म्हणून Xiaomi 17T हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या डिव्हाईसमध्ये मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा आणि पावरफुल प्रोसेसर देण्यात आला आहे.

  • 05 Jun 2026 11:10 AM (IST)

    05 Jun 2026 11:10 AM (IST)

    इराणवर आणखी हल्ले नाहीत? पण ट्रम्प यांनी आखली ‘रेड लाईन’, काय आहे नवी रणनीती?

    US-Iran Conflict News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराणमध्ये सध्या पडद्याआड शांतता चर्चा सुरु आहे. काही दिवसांतच दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करार होईल असा दावाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला आहे. ट्रम्प सध्या इराणशी युद्ध लढण्याच्या मनस्थिती नाही. यामुळे त्यांनी इराणला करार लवकरात लवकर मान्य करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. तसेच त्यांनी हल्ल्याची धमकीही दिली आहे. परंतु यावर त्यांनी एक सीमित रेषा निश्चित केली आहे.

  • 05 Jun 2026 11:00 AM (IST)

    05 Jun 2026 11:00 AM (IST)

    कधी आणि कसा स्वच्छ करावा Solar Panel? 90 टक्के लोकांना माहिती नाही महत्त्वाचे नियम

    सोलार पॅनलमध्ये मुव्हींग पार्टस नसतात, त्यामुळे याला जास्त देखभाल करण्याची गरज भासत नाही. मात्र असे असले तरी देखील वेळोवेळी सोलार पॅनलची साफसफाई करणे गरजेचे आहे. जर सोलार पॅनलवर धूळ आणि कचरा जमा झाला तर त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. याच कारणामुळे मॅन्युफॅक्चरर सहसा सोलर पॅनल योग्य पद्धतीने साफ करण्याचा सल्ला देतात. पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे सोलर पॅनलवरील धुळ, माती, घाण, कचरा आणि सुकलेली पाने इत्यादी आपोआप साफ केली जातात. मात्र दरवेळी सोलर पॅनलच्या स्वच्छतेसाठी पावसाळ्याची वाट बघू शकत नाही. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सोलर पॅनलची साफसफाई कधी आणि कशी केली जाऊ शकते.

  • 05 Jun 2026 10:50 AM (IST)

    05 Jun 2026 10:50 AM (IST)

    इशाक दार यांनी अमेरिकेत जाऊन इराणच्या अणुकार्यक्रमाची गुपिते केली उघड

    आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या अमेरिका, इराण आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील राजनैतिक संबंधांना घेऊन एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस, म्हणजेच २९ मे २०२६ रोजी वॉशिंग्टनचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतर एका माजी सीआयए (CIA) विश्लेषकाने केलेल्या दाव्यामुळे संपूर्ण जगात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. इशाक दार यांनी या बैठकीत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहिती अमेरिकेला दिल्याचा दावा या विश्लेषकाने केला आहे. या गंभीर आरोपावर आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने अधिकृत प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • 05 Jun 2026 10:40 AM (IST)

    05 Jun 2026 10:40 AM (IST)

    उर्जा सुरक्षेसाठी भारताचा नवा प्लॅन; क्रूड ऑइलसाठी व्हेनेझुएलासोबत वाढवणार सहकार्य

    भारत आणि व्हेनेझुएलाच्या संबंधांना नवी दिशा मिळत आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज सध्या भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Nrendra Modi), परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक केली. या बैठकीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि भारताच्या उर्जा सुरक्षेला प्राधान्या देण्यात आले.

Web Title: 5th june2026 live breaking news marathi maharashtra national international sports crime share market live update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल
1

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

Maharashtra Breaking News Updates Today: अखेर  धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा
2

Maharashtra Breaking News Updates Today: अखेर धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा

Sushma Andhare: ‘मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा, TET घोटाळा फडणवीसांच्याच काळात’; सुषमा अंधारेंचा पुराव्यांसह थेट हल्लाबोल
3

Sushma Andhare: ‘मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा, TET घोटाळा फडणवीसांच्याच काळात’; सुषमा अंधारेंचा पुराव्यांसह थेट हल्लाबोल

Vijay Wadettiwar: ‘विद्यार्थ्यांवर लाठीमार अन् ड्रग्जची धमकी हा लोकशाहीवर हल्ला’; विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
4

Vijay Wadettiwar: ‘विद्यार्थ्यांवर लाठीमार अन् ड्रग्जची धमकी हा लोकशाहीवर हल्ला’; विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.