ठाणे: रविवारी मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा(Dasara Melava) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. हा मेळावा आटोपून गावाी परतणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Higway) शहापूर (Shahapur) जवळ हा अपघात झाला. या अपघाता 6 ते 7 जण जखमी झाले आहेत.
[read_also content=”दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत दुर्घटना, जनरेटरचा स्फोट होऊन 10 मुलं भाजली https://www.navarashtra.com/maharashtra/10-children-injured-in-blast-at-durgadevi-immersion-procession-in-satara-nrps-473706.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार संघातील कार्याकर्ते रविवारी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. मेळावा आटोपून परत येताना त्यांच्या बसची आणि ट्रकची धडक झाली. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या. यात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या तर, इतर दोन बसचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रस्त्यावर काचांचा खच पडला आहे. या विचित्र अपघातात 6 ते 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून काहींना गंभीर इजाही पोहोचली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य आणि वाहने हटवण्याचे काम केलं जातं आहे.