Amravati News: अमरावतीतील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई! २३ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुविधा
विदर्भात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार विभागातील २३ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सध्या ३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने १५० विहिरी व बोअरवेलही अधिग्रहित केल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील एका तालुक्यातील ८ गावामध्ये १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील ४ तालुक्यांमधील १५ गावांमध्ये १५ टँकर सुरू आहे.(फोटो सौजन्य – istock)
कापूस उत्पादकासाठी स्वतंत्र उत्पादकता मिशन! केंद्र शासनसतर्फे ‘मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी’ जाहीर
अकोला, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसले तरी मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३९ टैंकर चालवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये अमरावती विभागात एका टप्प्यावर तब्बल १२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे सध्या वाढत दिवसात पाणीटंचाई अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता कायम राहावी यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर जलस्रोतांचे अधिग्रहण केले आहे. विभागातील २२ तालुक्यातील १५० गावांमध्ये एकूण ११९ विहिरी आणि ३१ बोअरवेल प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आल्या. या उपाययोजनांमुळे पाइपलाइन दुरुस्ती, मोटार सुरू ठेवणे, व्हॉल्व्ह नियंत्रण आणि पाणी वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
अमरावतील ६२७ रुग्णांना ५.२८ कोटींची मदत! आरोग्यसेवेला मिळणार गती; मुख्यमंत्री निधीतून गरजूंना दिलासा
दरम्यान, ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीही समोर येत आहे. वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून लवकर उपाययोजना न झाल्यास येत्या काही दिवसात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विभागाची विभागात एका टप्प्यावर तब्बल १२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता कायम राहावी यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर जलस्रोतांचे अधिग्रहण केले आहे.






