फोटो सौजन्य - Social Media
कोणत्या राज्यातून किती pre-booking?
भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 13.14 कोटी रुपयांची अॅडव्हान्स कमाई केली आहे. त्यापैकी केरळमध्येच सर्वाधिक म्हणजे 8.52 कोटी रुपयांची तिकीटविक्री झाली. कर्नाटकातून 1.80 कोटी, आंध्र प्रदेश-तेलंगणातून 1.34 कोटी तर तामिळनाडूमधून 76 लाख रुपयांचे बुकिंग नोंदवले गेले. Jeethu Joseph दिग्दर्शित या चित्रपटाच्या मल्याळम व्हर्जनने 11.54 कोटींची कमाई केली असून तेलुगू, तामिळ आणि कन्नड आवृत्त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विदेशातही ‘दृश्यम 3’ची जबरदस्त हवा पाहायला मिळत असून ओव्हरसीज मार्केटमध्ये चित्रपटाने 22.13 कोटी रुपयांची तिकीटविक्री केली आहे. BookMyShow वर सर्वाधिक प्री-सेल्स मिळवणाऱ्या मल्याळम चित्रपटांच्या यादीत ‘दृश्यम 3’ने 644K तिकिटांची विक्री करत दुसरे स्थान पटकावले आहे. ‘Patriot’, ‘The GOAT Life’, ‘Aadu 3’ आणि ‘Turbo’सारख्या चित्रपटांनाही या चित्रपटाने मागे टाकले आहे.
केरळमध्ये सर्व भाषांतील चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगच्या यादीतही ‘दृश्यम 3’ने तिसरे स्थान मिळवत मोठा पराक्रम केला आहे. Coolie ला मागे टाकत या चित्रपटाने नवा विक्रम रचला. मात्र Leo आणि L2: Empuraan हे चित्रपट अजूनही पहिल्या दोन स्थानांवर कायम आहेत. या यशामुळे मोहनलाल यांची लोकप्रियता आणि त्यांची बॉक्स ऑफिसवरील ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.






