मुंबई- ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते आणि माजी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी अंमलबाजवणी संचलनालयानं (ED) धक्का दिला आहे. ईडीनं परब यांची १० कोटी २० लाखांची संपरत्ती जप्त करण्यात आली आहे. पैशांच्या अफरातफरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीनं दिलीय. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ही जप्त करण्यात आलेली मालमत्ता ही जमिनीच्या रुपात आहे, साधारणपणे ४२ गुंठे जागा जप्त करण्यात आली आहे. या जागेची किंमत २ कोटी ७३ लाख ९१ हजार इतकी आहे. तर याच जागेत बांधण्यात आलेलं साई रिसॉर्टही ईडीनं ताब्यात घेतलं आहे. या रिसॉर्टची किंमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार इतकी आहे. भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी या प्रकरणात सातत्यानं पाठपुरावा केला होता. साई रिसॉर्टवर हातोडा पडेल, यासाठी सोमय्या प्रयत्नशील होते.
ED says it has attached assets worth more than Rs 10 crore in money laundering probe against former Maharashtra minister Anil Parab, others
— Press Trust of India (@PTI_News) January 4, 2023
ईडीने आज मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केल्याची माहिती दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन आणि तेथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.
— NEWSDAILY MEDIA GROUP (@NEWSDAILY123) January 4, 2023
किरीट सोमय्या यांच्या या ट्विटनंतर रश्मी ठाकरे यांच्यावर तक्रार देण्यात आली होती. कोरले अलिबाग १९ बंगले घोटाळा. रेवदंडा पोलिस स्टेशन येथे ठाकरे आणि वायकर परिवार यांचा विरोधात, ग्रामपंचायतीची नोंद खोटी, फोर्जरी करणे बेकायदेशीर कृत्ये करणे. म्हणून IPC 415,420,467,468,471 अंतर्गत तक्रार सोमय्या यांनी दाखल केली. त्यानंतर परब यांच्यावर ही कारवाई होत आहे.
Now ED action against #AnilParab
ED attached #SaiResort & other Properties of Anil Parab
Anil Parab ka Hisab Pura Kiya Jayega @BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde pic.twitter.com/1yQlF8DbkS
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 4, 2023
ही मालमत्ता जप्त स्वरुपात
अंदाजे 42 गुंटा मोजून गट क्रमांक 446, मुरुड,दापोली, रत्नागिरी, ₹ 2,73,91,000 किमतीचे आणि साई रिसॉर्ट NX चे रिसॉर्ट सदर जमिनीची किंमत ₹ 7,46,47,000
परबांची सहा महिन्यापूर्वी चौकशी
अनिल परब यांना ईडीने आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. गेल्या तीन दिवासांपासून त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी त्यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. तर बुधवारी आठ आणि गुरुवारी सहा तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आज परबांना ईडीने पुन्हा चौकशासाठी बोलावले आहे.
काय आहे प्रकरण?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे