'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती (Photo Credit- Social Media)
बारामती : लोकसभा निवडणुकीत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. बारातमतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली आणि सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव झाला. त्यांच्या या पराभवाची सल आजही अजित पवार यांच्या मनात असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी आज पुन्हा आपल्या मनातील ही सल बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला, अशी खंत अजित पवार यांनी आज बोलून दाखवली. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ते सोमेश्वरनगर येथे बोलत होते.
लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, या पॅटर्नची आठवण करून देत अजित पवार म्हणाले, लोकसभेला साहेबांना वाईट वाटू नये म्हणून बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला आणि मी तो स्वीकारला. पण मनातील खदखद व्यक्त करतानाच त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत मतदान कऱण्याचे आवाहन केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी हक्काने तुमच्याकडे मते मागण्यासाठी आलो आहे. यावेली मला खूश करण्यासाठी विधानसभेला मला मतदान करा, असं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलं.
हेही वाचा: ‘महायुती सरकार लाडकं नव्हे तर लबाड…’, विलासराव देशमुखांच्या लेकाने लातूरमध्ये गाजवली सभा
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल मनात ठेवून अजित पवार यावेळी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच काका विरूद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. त्यामुळे बारामतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही आपापली ताकद पणाला लावली आहे.त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार म्हणाले, सध्या बारामतीकर द्विधा मनस्थितीत आहेत. पण त्यांना माझी विनंती आहे. त्यांनी लोकसभेला सुप्रियाताईंना मतदान केले आता विधानसभेला मला मतदान करतील. बारामतीत सगळ्यात जास्त कामेही ही माझ्या कारकिर्दीत झाली आहेत. अनेकांनी माझ्या बरोबरच कामाला सुरुवात केली होती. पण गावातील राजकारणातही वाद आहेत. तेही मला चांगलेच माहिती आहेत. पण आता या वादाचा फटका मला बसू देऊ नकात.
हेही वाचा: माढा विधानसभेत येणार रंगत; संजय कोकाटेंसह भारत शिंदेंचा अभिजीत पाटलांना पाठिंबा
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत महायुतीला 175 पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. महायुतीचे आम्ही सर्व नेते जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहोत. महायुताली 175 पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. आमचे नियोजन आणि चर्चा झाल्या आहेत. कोणाचा सभा घ्यायच्या याबाबतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा झाली आहे.