
Top Marathi News Today: चांदीच्या किमतीत उसळी! लवकरच पार करणार 3 लाख रुपयांचा टप्पा
16 Jan 2026 12:19 PM (IST)
शेतातील पाणीपुरवठ्याच्या वादातून 9 वर्षांच्या चुलत भावाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी अंबाजोगाई सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अतुल गित्तेला जन्मठेप सुनावली. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी.
16 Jan 2026 12:00 PM (IST)
ग्रेटर नोएडाच्या सूरजपूरमधील हायरेज सोसायटीत 20 वर्षीय मनीषचा बाल्कनीत मृतदेह आढळला. पार्टीनंतर मृत्यू झाला. आत्महत्या, अपघात की हत्या याबाबत पोलिस तपास सुरू आहे.
16 Jan 2026 11:50 AM (IST)
गुरुवारी, क्रिकेटपटूंच्या बहिष्कारामुळे दोन सामने पुढे ढकलण्यात आले. खेळाडू आणि जनतेच्या दबावाखाली, बीसीबीने कारवाई केली आणि नझमुलला बोर्डाच्या वित्त समितीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले.
16 Jan 2026 11:40 AM (IST)
केतू नक्षत्र बदलाच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कामात सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्या राशीच्या लोकांनी राहावे सावध जाणून घ्या
16 Jan 2026 11:32 AM (IST)
जागतिक भू-राजकारणात सध्या अशा एका संघर्षाची ठिणगी पडली आहे, ज्यामुळे दशकांपासून सुरू असलेली ‘नाटो’ युती धोक्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची धमकी दिल्यानंतर, डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी वॉशिंग्टनला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. “ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अविभाज्य भाग आहे आणि तो कोणत्याही किंमतीत विक्रीसाठी नाही,” अशा शब्दांत त्यांनी ट्रम्प यांच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेला लगाम घातला आहे.
16 Jan 2026 11:20 AM (IST)
'बिग बॉस मराठी ६' मध्ये सध्या स्पर्धकांमध्ये राडा होताना दिसत आहे. अशातच आता घरात चौथ्या दिवशी कॅप्टनसी टास्क देखील रंगला आहे. तसेच आता 'बिग बॉस'च्या घरात पुढे काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
16 Jan 2026 11:10 AM (IST)
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये महिला व तिच्या तीन चिमुकल्यांचे अपहरण करून निर्घृण हत्याकांड उघडकीस आले आहे. गंडक नदीकाठी चौघांचे मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे
16 Jan 2026 10:59 AM (IST)
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आगामी सामना हा विश्वचषकाचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना 15 जानेवारी रोजी होणार आहे. या तिकिटांची विक्री काल सुरू करण्यात आली होती. पण या तिकिटांची विक्री झालीच नाही कारण तिकिटांची विक्री सुरू केल्यानंतर लगेचच वेबसाइट BookMyShow क्रॅश झाली आणि चाहत्यांना तिकीटे घेता आली नाहीत. तिकिट विक्रीचा टप्पा कधीचा पार पडला होता. काल दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता. या टप्प्यामध्ये कोलंबोमध्ये होणाऱ्या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी मोठी मागणी वाढली.
16 Jan 2026 10:51 AM (IST)
स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) आजच्या दिवशी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. १६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजे हे अभिषिक्त राजे झाले. धर्मवीर, महापराक्रमी, १२१ युद्धे जिंकणारे, संस्कृतचे विद्वान, ‘बुधभूषण’ ग्रंथाचे लेखक आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य कारभार (Dinvishesh) सांभाळला.
16 Jan 2026 10:44 AM (IST)
बुधवारी वित्त मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नवे पॅकेज जाहीर केले आहे. वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) ने केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी ‘संयुक्त वेतन खाते पॅकेज’ सादर केले आहे. या पॅकेजचा उद्देश एकाच खात्याखाली बँकिंग आणि विमा लाभांसह व्यापक सेवा उपलब्ध करणे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पॅकेजचे तीन मुख्य घटक आहेत. जसे की बँकिंग, विमा आणि कार्ड, ज्यामुळे हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित वित्तीय समाधान प्रदान करते. ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
16 Jan 2026 10:39 AM (IST)
Pune Municipal Election Result 2026 Live: पुण्यात रुपाली ठोंबरे पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. पहिल्या कलांनुसार रुपाली ठोंबरे पाटील पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
16 Jan 2026 10:33 AM (IST)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणि मुलाच्या संभाषणाचा गोड व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. योगींनी मुलाला विचारले की, तुला काय हवे आहे. अशावेळी सर्वांसमोर न बोलता चिमुकल्याने गुपचूप योगींच्या कानात कुजबुज करत आपली मागणी त्यांना सांगितली. मुलाच्या मागणीवर योगींना इतके आश्चर्य वाटले की त्यांनी पुन्हा एकदा त्याला काय हवं ते विचारलं जेव्हा मुलाने तिच गोष्ट पुन्हा बोलून दाखवली तेव्हा त्यांना हसू अनावर झालं. वास्तविक, मुलाने योगी आदिनाथांकडे त्याला चिप्स आणून देण्याची मागणी केली होती. चिमुकल्याच्या या साध्या मागणीवर तिथे उपस्थित सर्वांनाच हसू फुटलं आणि लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करायला सुरुवात केली.
16 Jan 2026 10:27 AM (IST)
मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बडवाणी जिल्ह्यातील निवाली एकलव्य आदर्श शासकीय निवासी वसतिगृहात मंगळवारी घडली. विद्यार्थिनीने स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वसतिगृह प्रशासनावर गंभीर दुर्लक्ष आणि मानसिक दबाव टाकल्याचे आरोप करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
16 Jan 2026 10:26 AM (IST)
मुंबई BMC: भायखळ्यात भाजपची मुसंडी
भायखळा येथील मतमोजणी केंद्रावर टपाली (पोस्टल) मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली असून, प्रभाग क्रमांक २०७ मध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे यांनी आघाडी घेतली आहे. या प्रभागात अखिल भारतीय सेनेच्या योगिता गवळी आणि मनसेच्या शलाका हरियाण यांच्याशी त्यांची प्रमुख लढत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भायखळा परिसरात भाजपला मतदारांनी मोठी पसंती दिल्याचे दिसत आहे.
मनसेचे खाते उघडले
मुंबईत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपले खाते उघडले आहे. जोगेश्वरी संदेश देसाई हे सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडीवर असून, यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईच्या सत्तेत मनसे किंगमेकरच्या भूमिकेत राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव: महायुतीची विजयी घोडदौड
जळगाव महानगरपालिकेच्या ६३ जागांसाठी होणाऱ्या मतमोजणीत सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. यामध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) म्हणजेच महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. जळगावमध्ये गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाची जादू पुन्हा एकदा चालताना दिसत आहे.
16 Jan 2026 10:17 AM (IST)
भारताचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज आरोन जॉर्जला टेनिस एल्बो दुखापत झाली आहे आणि सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषकातील उर्वरित सामन्यांमध्ये त्याचा सहभाग अनिश्चित आहे. अमेरिकेविरुद्धच्या स्पर्धेतील संघाच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही तेव्हा कर्णधार आयुष म्हात्रे यांने १९ वर्षीय खेळाडूबद्दल अपडेट दिले. जेव्हा अंतिम इलेव्हनची घोषणा करण्यात आली तेव्हा आरोनची अनुपस्थिती आश्चर्यकारक होती.
16 Jan 2026 10:16 AM (IST)
छत्रपती संभाजी नगरमधील सुरुवातीच्या कलांनुसार,
एमआयएम 5
भाजप 4
शिवसेना 3
शिवसेना UBT 3
काँग्रेस 1
राष्ट्रवादी 00
राष्ट्रवादी शरद पवार 00
16 Jan 2026 10:09 AM (IST)
वृंदावन येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना व्हीआयपी दर्शनाचं आमिष दाखवलं. त्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये नेत अश्लील व्हिडीओ बनवले आणि त्यांना ब्लॅकमेल करत हॉटेलवर नेल्याचा आरोप करण्यात आला. याआधीही आरोपी तरुणाने अनेक मुली आणि महिलांसोबत असेच कृत्य केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचं नाव प्रिन्स वर्मा असे आहे. तो केशीघाट येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहे.
16 Jan 2026 10:01 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच कौटुंबिक वादातून एकाने सख्ख्या भावाचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. खुनाचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघडकीस आणण्यात हिंगोली पोलिसांना यश आहे.
16 Jan 2026 09:50 AM (IST)
अभिनेत्री खुशी मुखर्जीविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील प्रभावशाली फैजान अन्सारी यांनी १३ जानेवारी २०२६ रोजी हा खटला दाखल केला. खुशीने भारतीय टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल टिप्पणी केली होती, असा दावा करत की तो क्रिकेटपटू तिला वारंवार मेसेज करत असे.
16 Jan 2026 08:53 AM (IST)
हिंगोली जिल्ह्यातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धाकट्या भावानेच आपल्या सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याची निर्घृण हत्या केली. नवनाथ नामदेव सावळे (२५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आरोपीचे नाव गजानन सावळे असे आहे. पोलिसांनी गजाननला दोन तासात जेरबंद केलं.
16 Jan 2026 08:43 AM (IST)
वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांच्या शरीरात अनेक बदल होतात. वयाच्या ४० नंतर शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, मानसिक तणाव, मासिक पाळीसंबंधित समस्या, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.चाळिशीनंतर शरीरातील स्नायू झिजण्यास सुरुवात होते. या समस्येला वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिया असे म्हणतात. शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडे कमकुवत होणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आणि थकवा जाणवणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे वाढत्या वयात शरीराला पोषण देण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन मिळेल
16 Jan 2026 08:33 AM (IST)
मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला प्रिमीयर लीगचा 10 वा सामना पार पडला. या सामन्यामध्ये यूपी वॉरियर्सच्या संघाने विजयाचे खाते उघडले आहे. हा सामना यूपी वॉरियर्सच्या संघाने हरलीन देओलच्या जोरावर जिंकला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यामध्ये हरलीन देओलला रिटायर आऊट करण्यात आले होते. या सामन्यामध्ये हरलीन देओलने संपूर्ण कसर पुर्ण केली. महिला प्रीमियर लीग २०२६ चा सामना १५ जानेवारी रोजी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात झाला.
16 Jan 2026 08:23 AM (IST)
गर्भवती असल्याचे निदान करून दाखल करण्यात आलेल्या एका महिलाच्या पोटात प्रत्यक्षात बाळ नसून ट्यूमर असल्याचे उघड झाल्याने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य यंत्रणेची गंभीर चूक समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निदानामुळे आरोग्य व्यवस्थेत एकच खळबळ उडाली आहे.
16 Jan 2026 08:13 AM (IST)
भारतात 16 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,361 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,164 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,771 रुपये आहे. भारतात 16 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,31,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,43,610 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,710 रुपये आहे. भारतात 16 जानेवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 295.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,95,100 रुपये आहे.
Maharashtra to World Breaking News: चांदीच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. त्यामुळे या वाढत्या किंमती पाहून ग्राहक प्रचंड चिंतेत आहेत. लवकरच चांदीचे दर 3 लाख रुपय़ांचा आकडा पार करू शकतात, अशी शक्यता देखील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याशिवाय आज भारतात निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.