आईच्या पोटात बाळ अन् त्या बाळाच्या पोटात ही बाळ; डॉक्टरही अचंबित
बुलढाणा जिल्ह्यात एक विचित्र केस समोर आली आहे. त्यामुळे डॉक्टरही अचंबित झाले आहेत. आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आलं आहे.अशा केस दुर्मिळ असतात असंही डॉक्टर सांगतात. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे.
तुम्हीसुद्धा जास्त भावुक आहात! मग जाणून घ्या डोळ्यांमधून येणाऱ्या अश्रुंचे शरीराला होणारे फायदे
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमित चेकींगसाठी एक गर्भवती महिला आली होती. ही महिला 32 वर्षाची आहे. तिला या आधी दोन मुलंही आहेत. हे तिचं तिसरं आपत्य असणार आहे. या तपासणी दरम्यान तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर अचंबित झाले. त्याला कारणही तसेच होते. महिलेच्या पोटात 9 महिन्याचं बाळ होतं. पण त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलं.
या बाळाची देखील वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असं म्हटलं जातं. अर्भकांमध्ये अर्भक असणं अशी ही घटना आहे. अशा केसमंध्ये एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असतं. साधारण पणे 5 लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली आहे.
सर्दी, खोकल्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीमध्ये घरी बनवा तुळशीचा काढा
डॉ. भुसारी सांगतात की, अशा केस या दुर्मिळ असतात. साधारणता पाच लाखात एखादी केस आढळते. याला फीटस इन फीटू असं म्हटलं जातं. मात्र अशा बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. हे तितकेच धोक्याचेही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या आधीही अशा केसेस समोर आल्याचे भुसारी यांनी सांगितले. दरम्यान अशी केस समोर आल्यानंतर त्याची चर्चा संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहे.
निरोगी आरोग्यासाठी शरीरातील सर्वच अवयव निरोगी असणे आवश्यक आहे. त्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे यकृत. यकृताचे कार्य बिघडल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, मानसिक तणाव, जंक फूडचे सेवन, मद्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम यकृताच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. यकृतामध्ये अनावश्यक चरबी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. फॅटी लिव्हरची समस्या प्रामुख्याने मधुमहे आणि वाढलेल्या वजनाने त्रस्त असलेल्या लोकांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.
फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. तसेच शरीरामध्ये फॅटी लिव्हरची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचणार नाही. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात.