आयुष्मान भारत जनआरोग्य योजना ठरली वरदान! (Photo Credit - X)
महात्मा फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रित अंमलबजावणी
महाराष्ट्रामध्ये ही योजना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत (MJPJAY) एकत्रितपणे राबवली जाते. या एकत्रित योजनेमुळे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनाही उपचारांचा लाभ मिळतो. यामुळे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांना मोठी वैद्यकीय मदत मिळत आहे.
ई-कार्ड वितरणात जिल्ह्याची प्रगती
शासनाच्या प्रयत्नांमुळे या आरोग्य योजनेअंतर्गत ई-कार्ड वितरणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने मोठी प्रगती केली असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
योजनेतील मोफत उपचार मिळवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याकडे आयुष्मान ई-कार्ड असणे आवश्यक आहे.
ई-कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया
जिल्ह्यातील नागरिकांनी आपले आयुष्मान ई-कार्ड तयार करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कांचन वानोरे आदींनी केले आहे.
ई-कार्ड बनवण्यासाठी आवश्यक:
ई-कार्ड बनवण्याचे ठिकाण: जिल्ह्यातील नागरिक आशा स्वयंसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, सीएससी केंद्रे (CSC Centres), आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार यांच्या माध्यमातून किंवा ॲपद्वारे स्वतःच बेनिफिशिअरी लॉगिन करून ओटीपीच्या मदतीने ई-कार्ड तयार करू शकतात.
जिल्ह्यातील शस्त्रक्रियांची आकडेवारी






