व्यापाऱ्याला अडवून अडीच लाखांची रोकड आणि दुचाकी लंपास (Photo Credit- X)
नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका आरोपीला पकडले
विशेष म्हणजे व्यापाऱ्याने आरडाओरड केल्यानंतर जमा झालेल्या नागरिकांच्या मदतीने व्यापाऱ्याने आरोपींपैकी एकाला दुचाकीसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन कैले. बुधवारी निवांत गोखले अटक केली. यश परबिन डमाळे (२०, रा. मयुर पार्क) असे अटक आरोपीचे नाव असून इरफान पटेल (२२. रा. किराडपुरा) अशी अटक आरोपीच्या पसार साथीदारांची नावे आहेत. शीतल नंदकिशोर दायमा (५०, रा. बालाजीनगर) यांनी फिर्याद दिली.
अशी घडली घटना
त्यानुसार, फिर्यादी हे जाधववाडी मोहा येथील त्यांचे काका हरिशंकर दायमा याचे नावे असलेलेक दायमा सुपर मार्केट चालवतात. २५ नोव्हेंबर रोजी राजी सुपर मार्केट बंद करून कॅश कलेक्शन असलेली २ लाख ७५ हजारांची रक्कम असलेली कॅरीबॅग एक्टिव्हाच्या डिकीत ठेवून शीतल दायमा आपल्या कॅशियर सोबत मोंढा येथून निघाले. कॅशियरला टीव्ही सेंटर चौकात सोडल्यानंतर ते सावरकर चौक कटकटगेट मार्गे पानदरीब्याकडे जात असताना होते.
केके पेट्रोल पंप जवळ असतांना त्यांच्या पाठीमागुन एका दुचाकीवर तोंडाला कपडा बांधून आलेल्या तिघांनी दायमा यांच्या गाडीसमोर गाडी उभी करुन त्यांना अडवले, तोंडाला कपडा बांधून आलेल्या तिघांनी दायमा यांना दुभाजकावर ढकलले. त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एका आरोपीने चाकूने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले.
कॅशसह दुचाकी लंपास
मारहाणीदरम्यान आरोपीपैकी दोघांनी दायमा यांची दुचाकी (एमएच-२५-एबी-८५९६) ज्यात २ ला लाख ७५ हजारांची रोख रक्कम होती ती घेवून पळ काढला.
दायमा यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले आणि गोंधळात दुसऱ्या दुचाकीवर पळ काढणाऱ्या एका आरोपीला दुचाकीसह (एमएच-२०-जीडी-१५२२) पकडले. तत्पूर्वी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर जिन्सी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत अटक केलेल्या आरोपीला ताब्यात घेतले.
मारहाणीदरम्यान आरोपींपैकी दोघांनी दायमा यांची दुचाकी (एमएच-२५-एबी-८५९६) ज्यात २ ला लाख ७५ हजारांची रोख रक्कम होती ती घेवून पळ काढला.






