• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Due To Continuous Rainfall Farmers Are Increasingly Turning To Sugarcane Cultivation

खरीप पिकांचे कंबरडे मोडले! सततच्या पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकडे

सतत सहा महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे मका, कापूस आणि अल्पकालीन खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. हमीचे पीक म्हणून शेतकरी आता मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकडे वळले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 15, 2025 | 03:45 PM
खरीप पिकांचे कंबरडे मोडले! (Photo Credit - X)

खरीप पिकांचे कंबरडे मोडले! (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • खिशातून पैसे गेले!
  • खरीप पिकांमध्ये उत्पन्न घटल्याने शेतकरी निराश
  • तालुक्यात उसाची विक्रमी लागवड अपेक्षित
सतत सहा महिने पडलेल्या पावसामुळे यंदा खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, यामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. ऊसाचे पीक वगळता उडीद, मूग, बाजरी, मका, कपाशी यांसारख्या प्रमुख पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. अल्पकालीन पिके असलेल्या उडीद, मूग, बाजरी आणि मका या पिकांची तर पूर्णपणे वाट लागली. मात्र, या अतिवृष्टीमध्ये फक्त ऊसाचे पीक हमीचे ठरल्याने, शेतकरी आता मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकडे वळले आहेत.

मका उत्पादनात मोठी घट, खर्चही वसूल झाला नाही

तालुक्यात यावर्षी खरीप मका पिकाची सर्वात जास्त म्हणजे ४९ हजार ४९७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. हे पीक साधारणपणे साडेतीन महिन्यांत काढणीसाठी येते.

मागच्या वर्षीची स्थिती: गतवर्षी मक्याला रु. २,२०० प्रति क्विंटल भाव मिळाला होता आणि सरासरी उत्पन्न एकरी २२ ते २५ क्विंटल होते, ज्यामुळे हे पीक फायद्याचे ठरले होते.

यंदाची स्थिती: सततच्या पावसामुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली. मका पिकाचे सरासरी एकरी उत्पन्न १२ ते १५ क्विंटलपर्यंत खाली आले. सरासरी बाजारभाव रु. ८०० ते रु. १,४०० मिळाल्याने, मक्यापासून एकरी सरासरी रु. १२ ते रु. २१ हजार उत्पन्न मिळाले.

आर्थिक फटका: मका सोंगणीसाठी एकरी रु. ८ ते रु. ९ हजार खर्च आला. नांगरणी, बियाणे, खत, कीटकनाशक फवारणी, निंदणी हा सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही, उलट खिशातून पैसे खर्च झाले.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhaji Nagar Drainage News: वर्षभरापासून ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट; कंत्राटदार पसार झाल्याने साईनगरवासीय त्रस्त!

कपाशी आणि आडसाली पिकालाही मोठा फटका

मका पिकाखालोखाल कपाशी पिकाची ३१ हजार ५९५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. अतिपावसाने या पिकाच्या उत्पन्नातही प्रचंड घट आली. कपाशीचे एकरी सरासरी ४ ते ११ क्विंटल उत्पन्न हातात आले. बाजारात कपाशीचा सरासरी भाव रु. ५ हजार ते रु. ६,५०० मिळत असल्याने उत्पादन खर्च वजा केल्यास ही शेतीही तोट्यात गेली आहे. याशिवाय, अतिपावसाने आडसाली पिकालाही मोठ्या प्रमाणात सड लागल्याने उत्पादनात प्रचंड घट येत आहे.

ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

ऊस पीक अतिपावसातही तग धरून राहते, तसेच त्याला हमीचे उत्पन्न मिळते. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असल्याने, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आता ऊस पिकाकडे मोर्चा वळवला आहे. यंदा तालुक्यात ऊसाची विक्रमी लागवड होण्याचा अंदाज आहे. शेतकरी सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड करून जास्तीचे उत्पादन निघणाऱ्या ऊसाच्या जातींना प्राधान्य देत आहेत.

बारामती ॲग्रोचे आवाहन: “ऊस पिकाचे कितीही उत्पन्न आले तरी त्याचे गाळप करण्याची हमी राहील. शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानानुसार जास्त उत्पन्न देणाऱ्या सुधारित जातीच्या ऊसाची लागवड करावी,” असे आवाहन बारामती ॲग्रोच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले

Web Title: Due to continuous rainfall farmers are increasingly turning to sugarcane cultivation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • farmer
  • Heavy Rainfall

संबंधित बातम्या

‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
1

‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Crime News: मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ; महिलेचा गर्भपात, परिसरात संताप
2

Crime News: मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ; महिलेचा गर्भपात, परिसरात संताप

ZP Election 2026: निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; प्रशासनाचा कडक इशाारा
3

ZP Election 2026: निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; प्रशासनाचा कडक इशाारा

Chhatrapati Sambhajinagar: बेकायदेशीर पिस्तूल हातात… ट्रिगर दाबताच सुटली गोळी; क्षणभराची मस्ती ठरली जीवघेणी!
4

Chhatrapati Sambhajinagar: बेकायदेशीर पिस्तूल हातात… ट्रिगर दाबताच सुटली गोळी; क्षणभराची मस्ती ठरली जीवघेणी!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

Feb 09, 2026 | 10:15 PM
कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

Feb 09, 2026 | 10:05 PM
माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

Feb 09, 2026 | 09:59 PM
चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज

Feb 09, 2026 | 09:42 PM
ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…

ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…

Feb 09, 2026 | 09:36 PM
Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड

Feb 09, 2026 | 09:32 PM
SA vs CAN, T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेचा नवख्या कॅनडासमोर 214 धावांचा डोंगर! मार्कराम- स्टब्स चमकले 

SA vs CAN, T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेचा नवख्या कॅनडासमोर 214 धावांचा डोंगर! मार्कराम- स्टब्स चमकले 

Feb 09, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.