"भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय...", शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट, 'या' नेत्याने केली घोषणा
संभाजीनगरमध्ये युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर आम्ही बैठका घेतल्या. स्थानिक कार्यकर्ते एक वेगळ्या भूमीकेत पाह्यला मिळाले. आधीच शंका आली होती. मी दरवेळी स्थानिक नेत्यांना फोन करून बैठका केल्या, बावनकुळे यांच्याबरोबर देखील बैठक झाली. शेवटच्या संपर्कात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या समोर जागा वाटप ठरले. त्यावेळी युती झाली या संभ्रमात होतो. मात्र ज्यावेळी जागा द्यायची तेव्हा शिवसेनेच्या जागा सोडल्या जातील असा प्रस्ताव दिला. आमचे कार्यकर्ते नाराज होतील अशी त्यांची भूमिका होती. तर दुसरीकडे युतीच्या चर्चा असल्याचे सांगणे. या घडीला सुद्धा कोणताही नवीन प्रस्ताव दिला नाही. आग्रही भूमिकेला तडा दिला.आमची ताकद वाढली आम्ही काहीही करू शकतो, असा त्यांना अहंकार होता त्याचा अंत आज भाजप शिवसेना युती तोडल्याने झाली.
आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही, थेट लढत होईल. या लढाईत जशाच्या तसे वार केले जाईल. भाजपने कुठे कट शिजविला आम्हाल माहिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर मला उघड बोलायला लावू नका, अशा हल्लाबोल संजय शिरसाट यांनी भाजपावर केला आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर या महापालिकेत भाजप व शिवसेना युती होणार असल्याचे चित्र असताना अन्य काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये युती फिस्कटण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, सोलापूर, अमरावती, मीरा-भाईंदर आदी ठिकाणी युतीची बोलणी यशस्वी न झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी केली आहे. सोलापूरमध्ये भाजपशी बोलणी फिस्कटल्याने शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शिवसेना-भाजप महानगरपालिकेत युतीबाबत सुरू असलेल्या चर्चाना रविवारी पूर्णविराम मिळाला.






