कोल्हापूर : राज्यात सत्तांतर झाले आहे, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेतली होती. यावेळी कॅबिनेटच्या शपथविधीवरून आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओढलेल्या माईकवरून सर्वत्र टीका होऊ लागली आहे. तसेच आता यावर विरोधकांनी सुद्धा निशाणा साधला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा आज माईक ओढला, उद्या पँट ओढतील, अशी टीका खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. त्यामुळं सावध राहा असा इशारा सुद्धा विनायक राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.
[read_also content=”महाविकास आघाडीत असताना आमदारांचे खच्चीकरण, म्हणून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://www.navarashtra.com/maharashtra/when-mla-were-in-the-mahavikas-aghadi-they-decided-to-go-with-bjp-chief-minister-eknath-shinde-304585.html”]
दरम्यान, हे सरकार बेकायदेशीर असून हे घटकेचं राज्य आहे. सहा महिने टिकलं तर नशीब असे म्हणत आज माईक ओढत आहेत. आज माईक ओढला, उद्या मुख्यमंत्र्यांची पॅन्ट ओढतील. तसेच जे बंडखोर आहेत त्यांना यापुढे राजकीय आयुष्य नाही, पुढील वेळी हे बंडाळी आमदार निवडून येतील याची सुद्धा खात्री नाहीय, असे टिकास्त्र विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदें व बंडाळी आमदारांवर सोडले.