मुंबई : शिवसेना 39 आमदारांनी बंड (Shivsena 39 MLA) केल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) येत सत्तांतर झाले आहे. मात्र शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात येऊन 27 दिवस उलटले तरीही मंत्रिमंडळाच्या विस्ताराला (Cabinet ministers) कोणताच मुहूर्त अजून मिळालेला नाही. त्यामुळे विरोधकांनी टिका केली असून मंत्रिमंडळाला विलंब का होत आहे, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच आज दिल्लीला जाणार आहेत. (CM Eknath shinde today going to New Delhi) दरम्यान, शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा दिल्लीला जात आहेत.
[read_also content=”उमेश कोल्हे खून प्रकरण, मध्यवर्ती कारागृहातच संशयित आरोपीवर पाच कैद्यांचा हल्ला https://www.navarashtra.com/maharashtra/accused-in-umesh-kolhe-murder-case-beaten-up-in-jail-case-registered-against-five-people-nrps-308671.html”]
दरम्यान, राष्ट्रपतीपदी शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही दिल्लीला एकत्र गेले होते. मात्र यावेळी मंत्रिमंडळा विस्ताराबाबत चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहे. तसंच 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात होत असलेल्या आमदार अपात्र सुनावणीसंदर्भातही चर्चा करणार आहे. दरम्यान, याआधीही एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. पण 12 तास प्रतिक्षा करूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदे यांना भेट दिली नाही. मंत्रिपदावरुन मात्र भाजप व शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु असून कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे.