कल्याण-अमजद खान : द्वारली येथील जमिनीच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पाेलिस निरिक्षकांच्या केबीनमध्ये आमदार गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार गेला. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. आमदार गायकवाड यांनी स्वत: गोळीबार केल्याची कबूली दिली. पोलिसांनी आमदार गायकवाड यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. ज्या हत्यारातून त्यांनी गोळीबार गेला. ते हत्यार देखील पोलिसांनी जप्त केले आहे. न्यायालयाने गायकवाड यांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस कोठडीत आमदार गणपत गायकवाड हे जेवण घेत नाहीत. त्यांना पोलिसांच्या जेवणावर गायकवाड यांचा विश्वास नाही. त्यामुळे ते केवळ फळांचे सेवन करीत आहेत ही माहिती सूत्रांनी दिली आहे. गायकवाड यांनी पोलिसांकडून दिले जाणारे जेवण त्यांनी नाकारले आहे. त्यांना पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या जेवणावर त्यांचा विश्वास नाही. ते केवळ फळांचे सेवन करीत आहेत.
आमदार गायकवाड यांनी गोळीबाराची कबूली दिली असली तरी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात त्यांचा मुलगा वैभव गायकवाड यांना देखील आरोपी घोषित करण्यात आले आहे. मुलाला या प्रकरणात पोलिसांनी नाहक गोवले आहे. मुलाचे नाव गोवण्यात राजकीय दबाव असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. या कारणामुळे गायकवाड यांनी पोलिसांचे जेवण नाकारत असल्याचे सांगण्यात आले.