औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांचे आम्हाला नेतृत्व नको. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) गादीचा सन्मान करतो; मात्र छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांचे आम्हाला नेतृत्व मान्य नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) सांगितले आहे.
राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजेंनी समन्वयकांना (Coordinator) बोलू न दिल्याने औरंगाबादेतील (Aurangabad) मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संभाजीराजेंनी आता आमचे नेतृत्व करू नये, अशी भूमिकाच मांडली आहे.
नेतृत्व करत असताना सर्व समावेशक आणि व्यापक असले पाहिजे. कोपर्डी प्रकरणापासून अन्यायाला वाचा फुटली. त्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो, जे पहिल्यापासून सर्वजण एकत्र होते. कालच्या बैठकीला त्यापैकी एकही माणूस नव्हता. नेमकी नेतृत्व करण्याची जबाबदारी कुणी दिली? कुणी सांगितले हे आमचे नेतृत्व आहे? आमचे कुणीही नेतृत्व नाही, हे आम्हाला मान्य नाही. फक्त छत्रपती शिवराय हेच आमचे नेतृत्व आहे, असे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे म्हणणे आहे.
समन्वयकांचा इशारा
तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारामध्ये घेता. काय चाललंय काय नेमकं? सर्व व्यापक बैठक का होत नाही. मोजकेच लोक गोळा करता. मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व कुणीही नाही. औरंगाबादमधून मोर्चाला सुरुवात झाली, आम्ही त्या मोर्चाचे शिलेदार आहोत. आमच्यासोबत चर्चा होत नसेल तर तुम्हाला पळताभुई थोडी होईल. अशी अवस्था केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही समन्वयकांनी दिला.