मुंबई : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maitree house) छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी आपण स्वत:हून अटक होण्याचे म्हटलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर आज कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता संजय राऊतांचा आणखी एका प्रकरणात पाय खोलात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळं राऊतांच्या (Sanjay raut) अडचणीत वाढ झाली आहे.
[read_also content=”देशमुख, मलिक व राऊतांनंतर…अब अगला नंबर किसका? https://www.navarashtra.com/maharashtra/today-sanjay-raut-arrest-by-ed-now-whose-next-number-310617.html”]
दरम्यान, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांना धमकावल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. त्याआधारे वाकोला पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच राऊत व पाटकर यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात राऊतांनी पाटकरांना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळं संजय राऊत एकिकडे ईडीच्या कचाट्यात असताना, दुसरीकडे स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुलं राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.