संग्रहित फोटो
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी आज, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
दरम्यान अशातचं आता कॉंग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ट्विट करुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. म्हणाले की, एकनाथजी शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंना स्मरुन घेतली. राज्यपालांनी त्यांना अडवले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यात शपथेआधी नेत्यांची नावे घेतली होती. म्हणून मंत्र्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली होती. आता राज्यपालांची भूमिका बदलली का?
एकनाथजी शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंना स्मरून घेतली
राज्यपालांनी त्यांना अडवले नाही
महाविकास आघाडी सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यात शपथेआधी नेत्यांची नावे घेतली होती म्हणून मंत्र्यांना पुन्हा शपथ घ्यावी लावली होती
आता राज्यपालांची भूमिका बदलली का?
— Atul Londhe (@atullondhe) June 30, 2022