मुंबई : एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिवसेना (Shivsena) आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी (MVA) कोसळले. मात्र, यानंतरही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अनेक धक्के बसले. अनेक पदाधिकारी आणि खासदारांनीही त्यांची साथ सोडली. त्यातच उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) युतीची घोषणा केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर फडणवीसांनी फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असे म्हणाले. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की काँग्रेस ही डुबती नाव आहे. मात्र, अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टवर कारवाईसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. ते मुंबईतून मांडवी एक्स्प्रेसने दापोलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. याबाबतही फडणवीसांना बोलणे टाळले.