मुंबई : मराठी माणूस स्वाभिमानासाठी पेटून उठतो तेव्हा उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते. हे ताजे उदाहरण आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapse) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat singh kosyari) यांच्या बदललेल्या वक्तव्यावर भाष्य केले. मागच्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल जे वक्तव्य केले होते, त्यासंदर्भात मराठी लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
[read_also content=”अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, अजित पवारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/the-victims-of-heavy-rains-should-get-immediate-help-ajit-pawar-311629.html”]
काय बोलले राज्यपाल
एका कार्यक्रमात बोलताना, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून (Mumbai) राजस्थानी व गुजराती (Rajsthani and gujrati people) लोकांना मुंबईतून काढावं, म्हणजे मुंबईत पैसा राहणार नाही, त्यामुळं मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं. यानंतर राज्यात तीव्र पडसाद पाहयाला मिळाले. तसेच राज्यपालांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आली होती. मंगळवारी गुजरात फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अमराठी लोकांनी मराठी शिकावे असे वक्तव्य राज्यपाल यांनी केले आहे. या वक्तव्याचे महेश तपासे यांनी स्वागत करताना महाराष्ट्रात राहणार्यांनी मराठी शिकली व बोलली पाहिजे असे स्पष्ट केले.