जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता आणि आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवरायांबाबत बेताल वक्तव्य आणि चुकीचा इतिहास मांडणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपाचे प्रवक्ते सुधांश त्रिवेदी आणि आमदार प्रसाद लाड यांचा जेजुरी पंचक्रोशीतील शिवप्रेमी व संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध करण्यात आला.
गुरुवारी (दि. ८) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा घेण्यात आली. ज्यांना महाराष्ट्राच्या संतपरंपरेची व महापुरुष – राष्ट्रपुरुषांच्या जाज्वल्य इतिहास व पराक्रमाची माहिती व अभ्यास नाही, अशा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप यांनी मागणी केली. तसेच येत्या १३ तारखेला पुणे बंदच्या आवाहनात जेजुरीकर सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘हर हर महादेव’ प्रदर्शित होऊ देणार नाही
छत्रपती शिवरायांचा चुकीचा व खोटा इतिहास मांडणारा ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात दौडले वीर सात’ हे चित्रपट महाराष्ट्रात कोठेही प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, असा इशारा शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी दिला.
[blockquote content=”विचारांची लढाई विचारांनी व्हावी. सावरकरांवर कोणी वैचारिक मांडणी केली म्हणून त्याला प्रत्युत्तर देताना छत्रपती शिवाजी महारांजाबाबत बेताल आणि चुकीचे करणे चुकीचे आहे. ही प्रवृत्ती ठेचण्याचे काम संभाजी ब्रिगेड निश्चितपणे करेल.” pic=”” name=”- अजयसिंह सावंत, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.”]
यावेळी विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, गटनेते सचिन सोनवणे, उद्योजक मेहबूब पानसरे, नगरसेवक अजिंक्य देशमुख उद्योजक प्रशांत लाखे, बापूराव भोर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा वंदना जगताप, रसिक जोशी, आदींनी निषेध नोंदविला. शिवाजी जगताप, आकाश शिळीमकर, संतोष बयास, विक्रम शिंदे, सचिन हंबीर, मंगेश शेवाळे, रमेश शेरे, सचिन हरपळे, अमीर बागवान, सलीम तांबोळी आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस कर्मचारी आण्णा देशमुख यांना निवेदन देण्यात आले.